Mumbai Airport Terminal 2 : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, 1 मिलियन डॉलर्सची केली मागणी

Mumbai International Airport : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, 1 मिलियन डॉलर्सची केली मागणी
Mumbai International Airport
Mumbai International AirportSaam Tv
Published On

Mumbai International Airport News :

एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळत आहे. ही धमकी मेलद्वारे मिळाली असल्याचे, सूत्रांनी सांगितलं आहे. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल 2 बॉम्बने उडवण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने हा स्फोट टाळण्यासाठी 48 तासांच्या आत 1 मिलियन डॉलर्स देण्याची मागणी केली आहे, तेही बिटकॉइनमध्ये.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai International Airport
DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! महागाई भत्त्यामध्ये होणार मोठी वाढ; थकबाकीही मिळणार

एका अधिकाऱ्याने सांगितले की, सहार पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला ज्याने “quaidacasrol@gmail.com” हा ईमेल आयडी वापरून धमकीचा ईमेल पाठवला. आरोपीने आज सकाळी 11.06 वाजता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या (MIAL) फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता.  (Latest Marathi News)

धमकीच्या मेलमध्ये आरोपीने म्हटले होते की, “तुमच्या विमानतळासाठी ही अंतिम चेतावणी आहे. सांगितलेल्या महिती प्रमाणे न झाल्यास, आम्ही विमानतळाच्या टर्मिनल 2 वर 48 तासांच्या आत बॉम्बस्फोट करू, आम्हाला बिटकॉइनमध्ये 1 मिलियन डॉलर्स पाठवा. 24 तासात आरोपीने धमकीचे दोन मेल केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai International Airport
Marathi Business Ideas : सुरु करा 'हा' व्यवसाय, दरमहा कमावू शकता 75,000 रुपये; सरकारही करत आहे मदत

या प्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकावणे आणि खंडणी मागितल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 385 , 505 (1) (बी) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. सूत्रांनी सांगितले की, ज्या आयपी अॅड्रेसचा वापर करून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com