Bail accused wreaks havoc in Panvel society; girl held hostage and police attacked with axe saamtv
क्राईम

Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

Panvel Crime: जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने आपल्या पुतणीला ओलीस ठेवत पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना पनवेलमध्ये घडली. या धक्कादायक घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली.

Bharat Jadhav

  • पनवेलमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीचा धुडगूस.

  • आरोपीने १६ वर्षीय मुलीच्या गळ्यावर कोयता ठेवून ओलीस धरले.

  • पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला करून नागरिकांना धमकावलं.

एका जामिनावर सुटलेल्या खुनाचा आरोपीने स्वतःच्या भावाच्या 16 वर्षीय मुलीला ओलीस ठेवत तिच्या गळ्यावर कोयता लावला. पुतणीला तिला धमकी देत आरोपीने पोलिसांवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. चित्रपटातील एखाद्या क्राइम सीनप्रमाणे घडलेली घटना पनवेलमधील एका सोसायटीत घडला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोबन बाबुलाल महातो असे आरोपीचे नाव आहे. सोबन महातोवर खुनाचा आरोप आहे. तो जामिनावर सुटलेला असून त्याने पनवेलच्या मंगला निवास इमारतीत धिंगाणा घातला. या संबंधित तक्रार इमारतीतील काही नागरिकांनी पोलीस ठाण्यात केली होती. बुधवारी रात्री सोबन बाबुलाल महातो कुऱ्हाड आणि कोयता घेऊन सोसायाटीतील घरात शिरला होता, अशी माहिती तक्रारदार नागरीकांनी पोलिसांना दिली होती.

या संबंधित तक्रार मिळताच आरोपी सोबन महातो एका घराचे कुलूप तोडून घरात शिरला होता. त्याच्याआधी त्याचे आई वडील आणि पुतण्या आणि पुतणी देखील घटनास्थळी उपस्थित होत्या. पोलिसांनी त्याला घराबाहेर येण्याचे आवाहन केले, त्यावेळेस त्याने त्याच्या आई वडिलांचा जीव घेईन,अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून आतमध्येही शिरण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्याने कुऱ्हाडीने पोलिसांवर हल्ला केला.

पोलिसांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर फायर ब्रिगेडला बोलवण्यात आलं. त्याच्या सहाय्याने पोलिसांनी सेफ्टी डोअर तोडलं. त्यानंतर त्याच्यावर चिली स्प्रे मारण्यात आला, तरी देखील तो नियंत्रणात येत नव्हता. त्यानंतर पोलीस जेव्हा दरवाजा तोंडून आत शिरले त्यावेळेस त्याने त्याच्या 16 वर्षाच्या पुतणीच्या गळ्यावर कोयता ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा पोलिसांनी शातं डोक्याने आणि संयमाने आरोपीला बोलण्यात गुंतवून त्याच्यावर झडप घातली. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याच्या ताब्यातील पुतणीची सुटका करण्यात आली.

पोलीस जेव्हा त्याला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत होते, त्याने पोलिसांवर कोयत्याने वार केले.या हल्ल्यात सम्राट डाकी आणि रविंद्र पारधी हे दोन पोलीस गंभीर जखमी झालेत. तर माधव शेवाळे आणि साईनाथ मोकल किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT