Raigad Crime : माणगावमध्ये सशस्त्र दरोडा; २० ग्राम सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या

Raigad Mangaon News : कुंभे धरण प्रकल्प परिसरात घरात एकटी राहत होती. संधी साधून महिलेचा घरात प्रवेश करत शस्त्राचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न
Raigad Crime
Raigad CrimeSaam tv
Published On

सचिन कदम 
रायगड
: रात्रीच्या सुमारास घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेच्या घरात प्रवेश करत सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. इतकेच नाही तर २० ग्रॅम सोन्याच्या दागिन्या करीता या वृध्द महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना माणगाव भादाव येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

रायगड जिल्ह्यातील माणगाव भादाव कुंभे धरण प्रकल्पच्या पुर्नवसन वसाहतीतील हि घटना येथे सदरची घटना घडली आहे. शांताबाई कांबळे (वय ७६) असे घटनेत मृत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. दरम्यान शांताबाई कांबळे या कुंभे धरण प्रकल्प परिसरात घरात एकटी राहत होती. हीच संधी साधून चोरटयांनी महिलेचा घरात प्रवेश करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

Raigad Crime
Ganpati Temple : गणेशोत्सवात गणपती मंदिरातील दान पेटीची चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

वृद्धेच्या डोक्यात शस्त्राने वार 

महिलेच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत शस्त्राचा धाक दाखवून घरातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी वृद्धेने प्रतिकार केल्याने वृध्देच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. यानंतर चोरटे २० ग्रॅम सोने घेऊन पसार झाले. घराच्या आजूबाजूला काही रहिवास नसल्याचे घटनेबाबत लवकर माहिती झाली नाही. मात्र घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.   

Raigad Crime
Lumpy Disease : धुळे जिल्ह्यात लम्पी संसर्ग वाढला; तीन किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

पोलिसांचे पथक दाखल 

पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तर या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळी फिंगर प्रिंट एक्सपर्ट, पॉरेन्सीक टिम व श्वान पथक मार्फत पाहणी करण्यात येत असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत घटनेचा स्वतंत्र तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com