Ganpati Temple : गणेशोत्सवात गणपती मंदिरातील दान पेटीची चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Raigad News : गणेशोत्सव सुरु असल्याने या काळात मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. मात्र ठिकठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने रात्रीच्या सुमारास मंदिरात फारशी वर्दळ नसते
Raigad News
Raigad NewsSaam tv
Published On

सचिन कदम

रायगड : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असून भाविक बाप्पाची आराधना करण्यात दंग आहेत. मात्र चोरट्यानी गणेशोत्सव काळात गणपती मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याची घटना रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.  

रायगड जिल्ह्यात माणगावच्या मुगवली येथे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी होत असते, सध्या गणेशोत्सव सुरु असल्याने या काळात मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. मात्र ठिकठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने रात्रीच्या सुमारास मंदिरात फारशी वर्दळ नसते. याची संधी साधत चोरटयांनी दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली आहे. 

Raigad News
Khamgaon Accident : खामगावजवळ दोन वेगवेगळे अपघात; तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

तिघांनी केली चोरी 

स्वयंभू असलेल्या गणपती मंदिरातील स्टीलची दानपेटी चोरांनी उचलून नेली. तीन चोरट्यानी हि चोरी केली असून यात दोघांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. तर एक चोर हातात काठी घेऊन पाळत ठेवत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान चोरी झालेल्या दानपेटीत किती रक्कम होती, याबाबत काहीही माहिती समोर आली नसून या बाबत पोलिस ठाण्यात तक्रार ही दाखल करण्यात आलेली नाही. 

Raigad News
Nanded : महालक्ष्मी सणासाठी आजोबांकडे आली; छतावर गेली असताना घडली दुर्दैवी घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

दोन दिवसा पूर्वी हि घटना घडली असून दान पेटी मंदीरातुन चोरू नेताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात मध्ये कैद झाले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे मंदिरातील दान पेटी अगर चोरीला गेलेली रक्कम यापेक्षा चोरट्यांकडून भविष्या मोठा धाडसी दरोडा टाकल्या जाण्याची भिती वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com