Lumpy Disease : धुळे जिल्ह्यात लम्पी संसर्ग वाढला; तीन किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

Dhule News : क्षेत्रापासून तीन किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र व १० किलोमीटर परिघ निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले. याचे आदेश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले आहेत
Lumpy Disease
Lumpy DiseaseSaam tv
Published On

धुळे : गुरांवर आलेला लंम्पी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. संसर्ग वाढल्याने काही ठिकाणी गुरांच्या बाजारावर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशात जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील धुळे शहर व शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे गाव येथील गोवर्गीय जनावरांमध्ये लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे या भागात साधारण तीन किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.  

राज्यातील अनेक भागात गुरांमध्ये लंम्पी हा संसर्गजन्य आजार पसरला आहे. यामुळे पशुवैद्यकीय प्रशासन अलर्ट असून याठिकाणी उपाययोजना देखील आखल्या जात आहेत. मात्र संसर्ग वाढत चालल्याने प्रशासनाकडून निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. त्यानुसार धुळे तालुका परिसरात वाढता संसर्ग लक्षात घेता तीन किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. 

Lumpy Disease
Nanded : महालक्ष्मी सणासाठी आजोबांकडे आली; छतावर गेली असताना घडली दुर्दैवी घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश 

धुळे तालुका, धुळे शहर व शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे या भागात अधिक प्रमाण वाढले असून रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होवू नये; म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार संसर्ग क्षेत्रापासून तीन किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र व १० किलोमीटर परिघ निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले. याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षा भाग्यश्री विसपुते यांनी दिले आहेत. 

Lumpy Disease
Ganpati Temple : गणेशोत्सवात गणपती मंदिरातील दान पेटीची चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

जनावरांना लसीकरण करण्याचे आदेश 

दरम्यान जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय पशुधनास प्रतिबंधित लसीकरण करुन त्याची भारत पशुधन पोर्टलवर नोंदीबाबत नियोजन करावे व शिघ्र कृतिदल स्थापन करुन अथवा पशुसंवर्धन विभाग धुळे मार्फत साथीचा आजार नियंत्रणात आणण्याची कार्यवाही करावी असे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील लंम्पी चर्मरोग प्रतिबंध लसीकरण न केलेल्या व लंम्पी चर्मरोग बाधित गोवर्गीय जनावराची वाहतूक करणे तसेच प्राण्यांच्या बाजार, शर्यती व प्रदर्शनामध्ये प्रवेश देण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी आदेशित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com