Pandharpur Crime News  Saam tv
क्राईम

Crime: पंढरपूर हादरले! सख्ख्या बहिणीकडून भावाची हत्या; ओढणीने गळा आवळला, नंतर मृतदेह शेतात नेऊन टाकला

Pandharpur Crime News: पंढरपूरमध्ये बहिणीने भावाची हत्या केल्याची घटना घडली. दारुचे व्यसन असलेल्या भावासोबत वाद झाल्यानंतर तिने हे भयंकर कृत्य केले. नवऱ्याच्या मदतीने तिने भावाचा गळा आवळला.

Priya More

Summary:

  • पंढरपूरमध्ये बहिणीने भावाची हत्या केली

  • पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील केम येथे घडली घटना

  • नवऱ्याच्या मदतीने बहिणीने भावाचा गळा आवळला

  • मृतदेह शेतामध्ये नेऊन टाकला

भरत नागणे, पंढरपूर

पंढरपूरमध्ये सख्ख्या बहिणीने भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. करमाळ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या भावाच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून सख्या बहिणीने नवऱ्याच्या मदतीने त्याची हत्या केली. ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह शेतामध्ये नेऊन टाकला. या घटनेमुळे पंढरपूर हादरले आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारी पोपट कांबळे (वय ३८ वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. ही घटना करमाळा तालुक्यातील केम येथे घडली. या प्रकरणी आरोपी बहीण शितल केंगारे आणि तिचा नवरा राजू केंगारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मल्हारी कांबळेला दारूचे व्यसन होते. ११ एप्रिल रोजी रात्री तो दारू पिऊन घरी आला. यावेळी बहीण शितल आणि त्याच्यात कडाक्याचे भांडण झाले.

याच रागातून शितल आणि तिच्या नवऱ्याने मल्हारीचा गळा ओढणीच्या सहाय्याने आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट‌ करण्यासाठी दोघांनी केम येथील एका शेतात विहिरीच्या बाजूला असलेल्या मक्याच्या गंजीत मृतदेह टाकला. सुरुवातीला याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात मल्हारीचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. पोलिस निरीक्षक रणजीत माने आणि त्यांच्या पथकाने मल्हारीची बहीण शितल राजू केंगारे आणि भावोजी राजेश बापू केंगारे यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली. यावेळी शितलने भावाच्या हत्येचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. या घनटेमुळे सोलापुरात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT