oshiwara police booked 19 year old youth from kashmir for getting minor girlfriend pregnant saam tv
क्राईम

Mumbai Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, काश्मिरी तरुणास अटक

मूलगी गर्भवती राहिल्याचे समजताच युवक काश्मीर कुपवाडा येथे पळून गेला.

Siddharth Latkar

- संजय गडदे

Oshiwara News :

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मागील दीड वर्षापासून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ओशिवरा पाेलीसांनी (oshiwara police) काश्मीर येथील अली बुखारी तारीक सय्यद उर्फ आकाश (वय १९) या संशयितास अटक केली आहे. (Maharashtra News)

ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुली सोबत 19 वर्षीय काश्मिरी तरुणाची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व पुढे तरुणाने त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (ऑगस्ट 2022 ते 18/10/23) तिच्या सोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे अल्पवयीन मुलगी 3 महिन्याची गरोदर राहिली.

मूलगी गर्भवती राहिल्याचे समजताच अली बुखारी तारीक सय्यद हा त्याच्या मूळ गावी काश्मीर कुपवाडा येथे पळून गेला. दरम्यानच्या काळात मुलीच्या आई वडिलांनी तिला मुंबईच्या वांद्रे भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलगी अल्पवयीन असल्यामुळे डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळविले. मुलीच्या आई-वडिलांनी तरुणाबाबत तक्रार दिली. पाेलिसांनी अली बुखारी तारीक सय्यद याचा शाेध सुरु केला.

पीडित मुलीवर उपचार सुरू असताना संशयित आरोपी तिला रुग्णालयात भेटण्यासाठी आला. यावेळी पीडित मुली सोबत रुग्णालयात असलेल्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार धेंडे याबाबतची माहिती पोलीस ठाण्याला दिली.

ओशिवरा पोलीस ठाण्याचे वपोनि मोहन पाटील यांनी संशयितास बोलण्यात गुंतवून ठेवण्याची सूचना धेडे यांना केली. दरम्यान तात्काळ बांद्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मराठे यांना भाभा रुग्णालयात पाेलिस कर्मचारी पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार वांद्रे पोलिसांचे कर्मचारी भाभा रुग्णालयात पोहोचून त्यांनी संशयितास ताब्यात घेतले.

ओशिवरा पोलिसांनी वांद्रे पोलिसांकडून संशयितास ताब्यात घेऊन ओशिवरा पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पाेलिसांनी अली बुखारी तारीक सय्यद उर्फ आकाश यास पोस्को कायद्याअंतर्गत अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT