Ajit Pawar: अमित शाह यांनी आम्हांला उद्या दिल्लीत बाेलावले आहे, 'त्या' महत्त्वाच्या प्रश्नांवर मार्ग निघेल : अजित पवार (पाहा व्हिडिओ)

Ban On Onion Export: केंद्र सरकारने कांद्यावर 31 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी लावली आहे.
ajit pawar to meet amit shah tommorow on onion issue
ajit pawar to meet amit shah tommorow on onion issuesaam tv
Published On

- राेहिदास घाडगे / अजय सोनवणे

Ajit Pawar News :

कांद्याच्या (onion issue), दूधाच्या (milk price) आणि अन्य प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या दाेन दिवसांत सहकारमंत्री अमित शहा (amit shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहाेत. त्यांच्या समवेत हाेणा-या बैठकीत निश्चित मार्ग निघेल अशी आशा उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज (गुरुवार) माध्यमांशी बाेलताना व्यक्त केली. (Maharashtra News)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आम्ही भाेपाळ येथे गृहराज्यमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्याशी आम्ही (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) राज्यातील कांदा, दूध दराचा प्रश्न, इथेनाॅल प्रश्नांबाबत चर्चा केली. शहा यांनी आम्हांला उद्या (शुक्रवार, शनिवारी) दिल्लीत या असे सांगितले आहे. आम्ही अधिवेशनाचे कामकाज संपल्यास दिल्लीला जाणार आहाेत. तेथे राज्यातील प्रमुख प्रश्नांविषयी चर्चा केली जाईल असेही अजित पवार यांनी म्हटले.

ajit pawar to meet amit shah tommorow on onion issue
Success Story: निळ्या तांदळाच्या शेतीचा मुळशीत यशस्वी प्रयाेग, 250 रुपये प्रतिकिलो मिळताेय भाव; वाचा तांदळाचे महत्व

कांद्याच्या दरात घसरण सुरूच

कांद्याला दर मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे शेतकऱ्यांनी आज कांदा लिलाव बंद पाडला. त्यानंतर नांदगाव - येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदाेलन छेडले. त्यामुळे रस्त्याची दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. नांदगाव बाजार समितीच्या लिलावात ५०० रुपयांपासून बोली सुरू झाली.तर जास्तीत जास्त १७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

आळेफाटा कांदा बाजारभावाला फटका

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (junnar krushi utpanna bazar samiti) आळेफाटा येथील उपबाजारात कांद्यास प्रति दहा किलोस ५२१ रुपयांचा बाजारभाव मिळाला. या वेळी कांद्याच्या १३ हजार ६९६ पिशव्यांची आवक झाली आहे मात्र निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली असल्याने शेतक-यांना मिळणारा बाजारभाव परवडणार नसल्याने शेतक-यांमध्ये नाराजीचा सुर पहायला मिळतोय.

Edited By : Siddharth Latkar

ajit pawar to meet amit shah tommorow on onion issue
Success Story: निळ्या तांदळाच्या शेतीचा मुळशीत यशस्वी प्रयाेग, 250 रुपये प्रतिकिलो मिळताेय भाव; वाचा तांदळाचे महत्व

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com