Adopted Daughter Kills Mother Saam Tv News
क्राईम

Shocking News : रस्त्याच्या कडेला पडलेल्या चिमुकलीला दिलं नवं आयुष्य, तिनेच घेतला आईचा जीव; Instagramमुळे बिंग फुटलं

Adopted Daughter Kills Mother : राजलक्ष्मी यांनी या मुलीला उचललं आणि आपल्या मुलीप्रमाणे तिचं पालनपोषण केलं, पण जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा तिनं दोन मित्रांच्या मदतीने आपल्याला जीवदान दिलेल्या तथा आपल्या याच आईची हत्या केली.

Prashant Patil

पारलाखेमुंडी : राजलक्ष्मी कर यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की ज्या अनाथ आणि रस्त्याच्या कडेला पडलेल्या चिमुकलीला उचलून त्यांनी मायेची ऊब दिली, छातीशी धरले, स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं, तीच मोठी झाल्यावर त्यांचा जीव घेईल. माणुसकी, नातेसंबंध आणि चांगुलपणावरील विश्वास उडावा इतका धक्कादायक हा प्रकार आहे. आरोपी मुलगी अल्पवयीन असून ती आठवीमध्ये आहे. तिने तिच्या दोन मित्रांच्या मदतीने तिला नवं आयुष्य देणाऱ्या आईच्या हत्येचा कट रचला.

ओडिशातील पारलाखेमुंडीमधील हे प्रकरण आहे. तीन दिवसांच्या मुलीला कोणीतरी रस्त्यावर सोडून गेलं होतं. राजलक्ष्मी यांनी या मुलीला उचललं आणि आपल्या मुलीप्रमाणे तिचं पालनपोषण केलं, पण जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा तिनं दोन मित्रांच्या मदतीने आपल्याला जीवदान दिलेल्या तथा आपल्या याच आईची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनं तिच्या दोन पुरुष मित्रांच्या मदतीने २९ एप्रिल रोजी राजलक्ष्मी कर (वय ५४) यांची हत्या करण्याचा कट रचला. हत्येचा उद्देश राजलक्ष्मी यांचा आपल्या मुलीच्या दोन मुलांसोबत असलेल्या संबंधांना विरोध करणे आणि तिची मालमत्ता हडपणे हा होता.

मुलीने कथितरित्या राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर उशीने त्यांचं तोंड दाबलं. त्यानंतर राजलक्ष्मी यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी, भुवनेश्वरमध्ये तिच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असं सांगण्यात आलं होतं. मुलीच्या योजनेनुसार सर्व काही ठीक चाललं होतं. राजलक्ष्मी यांना हृदयविकाराचा झटका आला नाही, तर त्यांची हत्या झाली आहे, असा संशय कोणालाही आला नाही.

कसा झाला उलगडा?

राजलक्ष्मी यांच्या हत्येला १५ दिवस उलटून गेले. तोपर्यंत मुलीवर कुणालाही संशय आला नाही. दरम्यान, राजलक्ष्मी यांचे भाऊ सिबा प्रसाद मिश्रा यांना मुलीचा मोबाईल फोन मिळाला. हा फोन भुवनेश्वरमध्येच राहिला होता. या मोबाईलची तपासणी केल्यावर इंस्टाग्रामवरील संभाषणातून हत्येच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळाली.

चॅटमध्ये राजलक्ष्मी यांची हत्या आणि त्यांचे सोन्याचे दागिने तसेच रोकड ताब्यात घेण्याची विशेष योजना आखण्यात आली होती. हा खुलासा झाल्यानंतर मिश्रा यांनी १४ मे रोजी परलाखेमुंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर केलेल्या तपासात तीन आरोपी, अल्पवयीन मुलगी, मंदिराचा पुजारी गणेश रथ आणि त्याचा मित्र दिनेश साहू यांना अटक करण्यात आली. हे दोघंही त्याच शहरातील रहिवासी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT