Trimbakeshwar 52 year old sadhu Murder Saam Tv News
क्राईम

Nashik Crime : नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूची हत्या? नशेखोराच्या हल्ल्यात साधूचा मृत्यू; CCTV समोर

Nashik Trimbakeshwar Sadhu Murder : त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या झालेल्या हत्येप्रकरणी वातावरण तापलं असून आखाड्याचे महंत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने महंत संतप्त झाले आहेत.

Prashant Patil

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देशासह जगभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात. भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी या ठिकाणी कायमच रांगा लागलेल्या असतात. याचदरम्यान, या त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात साधूवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराच्या मारहाणीनंतर ५२ वर्षीय साधूचा जागीच मृत्यू झाला.

त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या झालेल्या हत्येप्रकरणी वातावरण तापलं असून आखाड्याचे महंत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. तसेच या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने महंत संतप्त झाले आहेत. आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही पुरावे सादर केले आहेत. नशेखोरांच्या मारहाणीत संबंधित साधूचा मृत्यू झाल्याचं त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यातील महंतांचा आरोप आहे. या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीतील दारु दुकाने बंद करण्याची मागणी साधू महंतांकडून केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची फसवणूक होत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता घडलेल्या घटनेनं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT