Crime Saam Tv
क्राईम

Nashik Crime: निर्घृण घटनेनं नाशिक हादरलं, दोन भावांनी कुऱ्हाडीनं तरुणाचं शीरच केलं धडावेगळं

Nashik Crime Case: नाशिकमधील गावामध्ये दोन भावांनी कुऱ्हाडीचा वार करुन एकाचे शीर धडावेगळे केले. खून केल्यानंतर आरोपींनी पोलीस स्थानकात जाऊन आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

अजय सोनावणे (साम टीव्ही)

Nashik Crime: नाशिक जिल्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हादरला आहे. सकाळी दहाच्या सुमारास हत्येचा प्रकार घडला आहे. दोन आरोपींनी कुऱ्हाडीचा वार करुन एकाचे शिर धडावेगळे केले आहे. थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हलकल्लोळ झाला आहे. दोन्ही आरोपींनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ननाशी गावात हत्या झाली आहे. ननाशी गावातील प्राथमिक आरोंग्य केंद्राजवळ ही घटना घडली आहे. आरोपी सुरेश बोके आणि विशाल बोके यांचा गुलाब वाघमारे या व्यक्तीशी वाद होता. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास तिघे एकमेकांसमोर आले. त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरु झाली. वाद उफाळल्यानंतर हाणीमारी सुरु झाली. हाणीमारीत रागाच्या भरात बोके बंधूंनी गुलाब रामचंद्र वाघमारे याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला आणि त्याचे शिर धडावेगळे केले.

पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मागील दोन वर्षांपासून सुरेश बोके, विशाल बोके यांचा गुलाब वाघमारेशी वाद सुरु होता. वादावरुन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. आज सकाळी त्यांचा हा वाद उफाळून आला. भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. पुढे दोन्ही भावांनी मिळून गुलाब वाघमारेची हत्या केली. त्यानंतर एखाद्या चित्रपटाप्रमाणे ते दोघे मृत वाघमारेचे शिर आणि कुऱ्हाड घेऊन पोलीस स्थानकात आले. त्यानंतर त्यांनी केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांनी देत गुन्हा कबूल केला.'

सदर घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात घडली आहे. दोन्ही आरोपींनी पोलीस स्थानकात गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पेठ पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. या भीतीदायक प्रकारामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : अजित पवारांना मोठा धक्का; बाजार समितीच्या १३ सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव, नेमकं काय घडलं?

Devmanus: 'मी संपणाऱ्यातील नाहीये…'; माधुरीला कोणी मारलं? 'देवमाणूस'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Crime News: बंद घरात सापडला MBA विद्यार्थिनीचा कुजलेला मृतदेह; परिसरात खळबळ

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT