Nashik Crime News Saam Tv
क्राईम

Nashik Crime : पोलिसाच्या घरात रक्तरंजित थरार, छोट्या मुलानं मोठ्याचा घेतला जीव; चाकूने सपासप वार केले नंतर...

Nashik Crime News : नाशिकच्या आडगाव शिवारात किरकोळ वादातून सख्ख्या भावाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी लहान भावाला पोलिसांनी अटक केली असून आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या आडगाव शिवारात भावाने भावाची हत्या

  • किरकोळ वादातून प्रकार गंभीर वळणावर

  • चाकूने वार केल्याने मोठ्या भावाचा मृत्यू

  • आरोपी लहान भाऊ पोलिसांच्या ताब्यात

  • आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

नाशिकमधून भावाच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक प्रकार समोर आला आहे. आडगाव शिवारात किरकोळ भांडणातून पोलीस पुत्र असलेल्या लहान भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव शिवारातील डी मार्टच्या पाठीमागे असलेल्या सद्भावना पोलीस सोसायटीमध्ये राहणारे आणि ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी विजय गायकवाड हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. बुधवारी ते कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. यावेळी घरी त्यांची पत्नी, मोठा मुलगा संदीप विजय गायकवाड (वर्षे ३३) आणि लहान मुलगा अरविंद विजय गायकवाड (वर्षे ३१) हे घरी होते.

दुपारच्या सुमारास संदीप हा त्याच्या आईशी भांडण करत होता. यावेळी अरविंद याने त्याला आईशी भांडू नको असे सांगितले. याचा राग आल्याने दोघा भावांमध्ये भांडण सुरु झाले. यावेळी अरविंद याने घरातील चाकूने संदिपवर वार केला. हा वार वर्मी बसल्याने रक्तस्राव होऊन यात संदीपचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत संदीपला जिल्हा रुग्नालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी अरविंद गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या पतीला टॉर्चर केलं, ते आत्महत्या करणारच नाहीत; जीएसटी अधिकाऱ्याच्या पत्नीचा दावा

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा रद्द

उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Saturday Horoscope: गुंतवणुकीचा होईल फायदा, 4 राशींना होणार आर्थिक लाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT