Nashik Crime  Saam Tv
क्राईम

Shocking: ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या, गावात राहणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य; नाशिक हादरले

Nashik Crime: नाशिकमध्ये ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मालेगाव तालूक्यातील डोंगराळे गावात घडली. या प्रकरणी २६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे नाशिक हादरले.

Priya More

Summary:

  • नाशिकमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या

  • गावात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य

  • नाशिकच्या मालेगावमधील एका गावात घडली घटना

  • आरोपी तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या डोंगराळे येथे ही घटना घडली. या घटनेमुळे नाशिक हादरले. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील डोंगराळे गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली. डोंगराळे येथे ३ वर्षांच्या मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. या गावामध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाने चिमुकलीसोबत भयंकर कृत्य केले. या तरुणाने या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर ही गोष्ट कुणाला सांगू नये यासाठी त्याने तिची हत्या केली.

विजय संजय खेरनार (२४ वर्षे) असं आरोपी तरुणाचे नाव आहे. विजयने मुलीची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मालेगाव मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Minister Gogawale Video: शिंदेसेनेच्या आमदारानंतर मंत्र्यावर कॅशबॉम्ब, दळवींनंतर गोगावलेंचा नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ

Maharashtra Politics: राजकारणातील अजून एक घर फुटणार? शिंदे गटातील माजी मंत्र्याच्या मुलाने धरली भाजपची वाट

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT