Nashik Crime News: Saamtv
क्राईम

Nashik Crime: फटाके वाजवण्यावरुन वाद.. धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime News: नाशिकमध्ये फटाके उडवण्याच्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी

Nashik Crime News:

राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा पडतोय. सर्वत्र दिवाळीची धामधुम पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकमधूनन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये फटाके उडवण्याच्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू असतानाच भयंकर हत्येने नाशिक जिल्हा(Nashik) हादरुन गेला आहे. नाशिकच्या पथाडी गावात फटाके उडवण्याच्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. गौरव अखाडे असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मंगळवारी (१५, ऑक्टोंबर) रात्री ही घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच पोलिसांकडून एका संशयित आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सध्या सुरू आहे.

गोंदियातही भीषण हत्येची घटना..

ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोंदिया शहरात (Gondia) दोन दिवसांपूर्वी एक भीषण हत्येची घटना घडली. वाहनाला कट मारल्याच्या रागातून अर्पित उर्फ बाबू ऊके या २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT