Gondia Crime News: दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; गोंदियामधील थरारक घटना

Gondia Crime: मृतक आणि आरोपी यांच्यात गाडीला कट मारल्यावरून मोठा वाद झाला होता. त्यामुळे आरोपीने मृतकावर धारधार शस्त्राने हल्ला केला.
Gondia Crime News
Gondia Crime NewsSaam TV
Published On

शुभम देशमुख

Gondia Crime News:

दिवाळीच्या दिवशीच गोंदिया शहरात मध्यरात्री हत्येची थरारक घटना घडली आहे. या घटनेमध्ये २३ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आलीये. वाहनाला कट मारल्याने हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Gondia Crime News
Gondia Crime News: 'तुमच्या घरात गुप्तधन आहे, काढून देतो' अशी बतावणी करत 7 लाखांची फसवणूक

अर्पित उर्फ बाबू ऊके (२३) असे मृतकाचे नाव असून तो गोंदियातील आंबाटोली येथील रहिवासी आहे. मृतक आणि आरोपी यांच्यात गाडीला कट मारल्यावरून मोठा वाद झाला होता. त्यामुळे आरोपीने मृतकावर धारधार शस्त्राने हल्ला केला.

यातच घटनास्थळी अर्पित उर्फ बाबू याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना केले आहेत.

फटाका जवळ फुटल्याच्या रागातून चौघांवर चाकू हल्ला

राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढतायत. मुंबईच्या गोवंडी परिसरातही अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत फटाका जवळ फुटल्याच्या रागातून चौघांवर चाकू हल्ला करण्यात आलाय.

मुंबईच्या गोवंडी परिसरातील घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. निखील आणि निलेश या दोघांना पोलिसांनी अटक केलीये. देवनार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

Gondia Crime News
Karad Crime News : आमदार नितेश राणेंच्या दाैऱ्य़ानंतर कराड तालुका पाेलीसांची दमदार कामगिरी, युवकांकडून सहा तलवारी जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com