Buldhana Crime: फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद; गावातील ३२ जणांवर पोलिसांची कारवाई

Buldhana Crime : अल्पवयीन मुलीपुढे काही लोकांनी फटाका फोडून अश्लील हावभाव करून तिची छेड काढली होती.
Buldhana Crime
Buldhana Crimesaam Tv
Published On

Buldhana Crime :

फटाके फोडण्याच्या कारणावरून बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नगरात दोन समाजात वाद झाल्याची घटना घडलीय. या वादात काहीजणांनी एका महिलेच्या घरावर लाठ्या काठ्याने हल्ला करून घरातील सामानाची तोडफोड केली. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी गावातील ३२ जणांवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केलेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे करीत आहे. (Latest News)

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील पैनगंगा नगरात राहणाऱ्या नेहा शेषराव काटकर यांनी पोलिसात याविषयीची तक्रार दिलीय. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान त्या गल्लीतील काही महिलासोबत मंदिरात पूजेसाठी जात होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीपुढे काही लोकांनी फटाका फोडून अश्लील हावभाव करून तिची छेड काढली. त्यानंतर आपल्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ही हिसकावून घेत असल्याची तक्रार या महिलेनी दिलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेदरम्यान त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रतीक काटकर आणि वैभव आवारे हे तेथे आले. मुलीची छेड काढणाऱ्यांनी यांना काठीने आणि दगडाने मारहाण केली. यात हे दोघेही जखमी झाले. त्यानंतर या टोळक्याने त्यांच्या घराच्या खिडक्याचे काचा फोडल्या. त्यानंतर सामानाची तोडफोड केली.

यानंतर महिलेच्या या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी अमीर शाह, सलमान शाह, आसिफ शेख, जावेद शेख, जुनेद पठाण, अल्ताफ पठाण, जावेद पठाण, सुलतानशाह, नालूशा, फिरोज आणि इतर २० लोकांच्या विरुद्ध विविध कलमान्वये दाखल केलाय. या घटनेनंतर आज १३ नोव्हेंबर रोजी आमदार संजय गायकवाड यांनी मेहकर येथे काटकरची भेट घेतली. त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

एका समाजातील टोळक्यांने पैनगंगा नगरात माझ्या भाचीच्या घरावर हल्ला केला. शिवाय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. धर्माच्या स्टेट्स का ठेवता, या कारणाने अनेकवेळा या टोळीने लोकांशी वाद घातलेत. मी जातधर्माचा विरोध करीत नाही. पण पोलिसांनी या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केलीय.

Buldhana Crime
Pune News: ७० ते ८० जणांनी मिळून केली मारहाण, पुण्यात दोन गटात तुफान राडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com