पश्चिम बंगालच्या दक्षिण परगना जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेत्याची हत्या झालीय. यामुळे तेथील परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार झालंय. नेत्याची हत्या झाल्यानंतर टीएमसीच्या समर्थकांनी अनेकांच्या घरं पेटवून दिली आहेत. यासर्व घटनेवरून टीएमसी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. (Latest News)
सैफुद्दीन लस्कर ,असं हत्या झालेल्या टीएमसी नेत्याचं नाव आहे. आज सकाळी जॉयनगर येथे त्यांची हत्या झाली. लस्कर हे जॉयनगरच्या बामुंगाची भागातील तृणमूल युनिटचे प्रमुख होते. तर त्यांची पत्नी पंचायतच्या सरपंच आहेत. दरम्यान सैफुद्दीन लस्कर यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एका व्यक्तीला पकडलं. लस्कर यांच्या हत्येत या व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लस्कर यांच्या समर्थकांच्या जमावाने संशयितला पकडून त्याला मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर समर्थकांनी त्या परिसरातील घरं पेटवून दिली. तर तृणमूल काँग्रेस नेते सैफुद्दीन लस्कर यांच्या हत्यामागे सीपीएम समर्थकांचा हात असल्याचा आरोप टीएमसीच्या नेत्यांनी केलाय. दरम्यान सीपीएम नेते सुजन चक्रवर्ती यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.
हत्या तृणमूल काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह आहे, त्यामुळेच लस्कर यांची हत्या झालीय. सीपीएम नेत्यांवर आरोप लावण्याचा काही फायदा नाही. पोलिसांनी योग्य तपास केला पाहिजे, जेणेकरून सर्व कटकारस्थान समोर येईल, असं चक्रवर्ती म्हणालेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. याप्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.