Nandurbar 20 Year Old Youth Drowns Saam Tv News
क्राईम

Nandurbar News : इंजिनीअर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं, बापाला उच्चकोटीचा अभिमान; मात्र मित्रांसोबत गेलेल्या दिगंबरचा काळानं घात केला

Nandurbar 20 Year Old Youth Drowns : पोलीस निरीक्षक धर्मेंद्र पवार, ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील आणि नातेवाईकांनी रात्रीच्या अंधारात शोध मोहीम राबवली. बॅटरीच्या सहाय्याने परिसरात शोधण्यात आलं. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही.

Prashant Patil

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील प्रसिद्ध वाल्हेरी धबधब्यावर बुधवारी एक दुर्दैवी घटना घडली. सध्या वेलदा येथे राहणारा तरुण दिगंबर प्रदीपभाई मराठे (वय २०, मूळ गाव कुकरमुंडा) याचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला.

दिगंबर ऑनलाइन शैक्षणिक फॉर्म भरण्यासाठी कुकरमुंडा येथे गेला होता. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे काम न झाल्यानं त्याने दोन दिवसांनी पुन्हा जाण्याचा विचार केला. त्यानंतर घरी न सांगता तो आपल्या चुलत भाऊ अभिषेक मराठे आणि जय अहिर यांच्यासोबत वाल्हेरी धबधब्यावर फिरायला गेला. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास तिघे धबधब्यावर पोहोचले. यावेळी दिगंबर खोल पाण्यात गेला आणि नजरेआड झाला. मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो आढळला नाही. संध्याकाळपर्यंत तो न मिळाल्यानं ही बाब कुटुंबीयांना कळवण्यात आली. नंतर तळोदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली.

पोलीस निरीक्षक धर्मेंद्र पवार, ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील आणि नातेवाईकांनी रात्रीच्या अंधारात शोध मोहीम राबवली. बॅटरीच्या सहाय्याने परिसरात शोधण्यात आलं. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. गुरुवारी सकाळी स्थानिक तरुणांनी धबधब्याच्या खोल पात्रात शोध घेतल्यानंतर दिगंबरचा मृतदेह आढळून आला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आलं आणि नंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला.

कुकरमुंडा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इंजिनीअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या होतकरू तरुणाच्या मृत्यूनं परिसरात शोककळा पसरली आहे. तळोदा तालुक्यातील वाल्हेरी हे स्थळ १७ किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी दोन धबधबे आहेत. या ठिकाणी जिल्ह्यातून आणि गुजरात राज्यातून तरुण पर्यटक येत असतात. समाधानकारक पाऊस झाल्यानं याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे याठिकाणी देखील अनेकांचे जीव गेले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी तळोदा शहरातील दोन तरुण व्यापारी मित्रांसोबत धबधबा पाहण्यासाठी गेले होते. मात्र, याठिकाणी त्यांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT