Man Kills Girlfriend With Iron Rod Saam Tv
क्राईम

Nagpur Crime: चारित्र्याच्या संशयावरून गर्लफ्रेंडला संपवलं, लोखंडी रॉड डोक्यात घातला; हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

Man Kills Girlfriend With Iron Rod: नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या ३० वर्षीय गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केली. लोखंडी रॉडने डोक्यावर वार करत तिचा जीव घेतला. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये चरित्राच्या संशयावरून तरुणाने गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या दाभा परिसरात ही घटना घडली आहे. रॉडने गर्लफ्रेंडला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारंवार चरित्राच्या संशयावरून तरुणाने गर्लफ्रेंडची रॉड मारून हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नागपूरतील गिट्टीखदान पोलिस ठाण्यात याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपी अक्षय फरार झाला होता. पण पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला अटक केली.

हेमलता वैद्य (३० वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हेमलता या पतीच्या मृत्यूनंतर नागपूरमध्ये मुलीसोबत राहत होत्या. हेमलता यांचे अक्षय दाते या तरुणासोबत गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आहेत. पण अक्षय हेमलतावर नेहमी संशय घ्यायच्या. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते.

नेहमीप्रमाणे अक्षय आणि हेमलता यांच्यामध्ये याच कारणावरून भांडण झाले. हेमलता बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये बसल्या होत्या. त्याचवेळी अक्षय त्याठिकाणी आला. त्यानेसोबत लोखंडी रॉड आणला होता. बसल्याठिकाणीच अक्षयने हेमलताला रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. अक्षयने हेमलताच्या डोक्यावर रॉड मारला त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.

सोसायटीतील लोकांनी जखमी हेमलता यांना मेयो रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान हेमलता यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूमुळे पोरगी पोरकी झाली. गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी अक्षयला तत्काळ अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अतिरिक्त पोलीस महासंचालकांची आत्महत्या, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत जपान दौऱ्यावर, पोलीस दलात खळबळ

Kartik Maas 2025: आजपासून कार्तिक महिना सुरु, घरात ही ५ महत्वाची कामे करा धन-समृद्धी अन् शांती यईल

Pratap Sarnaik: जिथं मीरा-भाईंदरमध्ये मराठीसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली होती, तिथंच प्रताप सरनाईक म्हणाले 'मी हिंदीतच बोलतो अन् आयुक्तांना ... VIDEO

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांचा या ५ गोष्टी करा आत्मसात, १६-३० वयात पैशांची चणचण जाणवणारच नाही

SCROLL FOR NEXT