Nagpur Crime Saam Tv
क्राईम

Crime: नागपूर हादरले! घरात घुसून तिघांवर चाकूने सपासप वार, पाहुणी आलेल्या महिलेचा जागीच मृत्यू

Nagpur Crime: नागपूरमध्ये भाडेकरूने घरमालकाच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झालेत.

Priya More
  • घरात घुसून तलवार आणि चाकूने तिघांवर जीवघेणा हल्ला

  • नागपूरच्या अमरनगर परिसरातील घटा

  • पाहुणी आलेल्या संगीता राजू चौधरी यांचा जागीच मृत्यू

  • धर्मपाल डहाट आणि वनिता डहाट गंभीर जखमी झालेत

नागपूरमध्ये रक्तरंजित थराराची भयंकर घटना समोर आली आहे. जुन्या वादातू एका व्यक्तीने घरात घुसून तिघांवर चाकू आणि तलवारीने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे या घटनेत एकाचा मृत्यू झाला. घरी पाहुणे म्हणून आलेल्या महिलेचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या नवरा-बायकोवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नागपूर हादरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरात वैमनस्यातून ही थरारक घटना घडली. रोशन नीळकंठराव तराळ असं आरोपीचे आहे. रोशनने जुन्या घरमालकाच्या घरात घुसून नवरा आणि बायकोवर हल्ला केला. यावेळी त्यांच्या घरात आलेली पाहुणी देखील गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धर्मपाल डहाट आणि त्यांची बायको वनिता डहाट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम देवककर यांनी सांगितले की, जुन्या भाडेकरूकडून घरात घुसून डहाट कुटुंबीयांवर तलवार-चाकूने हल्ला करण्यात आला. डहाट यांच्या घरी पाहुणपणाला आलेल्या महिलेचा या हल्ल्यात मृत्यू झाला. तर डहाट दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असू त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आरोपी डहाट यांच्या घरात घुसताना सीसीटीव्हीत दिसत आहे.

आरोपी रोशन नीळकंठराव तराळने घरात घुसून तलवार आणि चाकूने धर्मपाल डहाट, त्यांची पत्नी वनिता डहाट आणि घरी आलेल्या पाहुणी संगीता राजू चौधरी यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात संगीता चौधरी यांचा रक्तस्त्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. तर धर्मपाल आणि वनिता डहाट गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोपी पूर्वी डहाट कुटुंबाकडे भाड्याने राहत होता. मोठ्या आवाजात रेडिओ लावण्याच्या वादातून त्याच्यात वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपी घरातच शांत बसला होता. स्थानिक नागरिकांनी त्याला खोलीत कोंडून ठेवले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापुरमध्ये 93 कोटीच्या पाणीपुरवठा योजने विरोधात शेतकरी आक्रमक...

Shiv Sena Hearing LIVE Updates :अपात्रतेचा निर्णय आधी, मगच पक्ष कोणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं मुंबईत खरेदी केलं कोट्यवधींचे घर; २८ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट, किंमत वाचून व्हाल अवाक्

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

SCROLL FOR NEXT