पराग ढोबळे, साम प्रतिनिधी
सुखी संसारात संशयाचं भूत शिरलं तर एक हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त होत असतं. नागपुरातही अशाच एका आनंदी कुटुंबावर संशयाची भूतबाधा झाली अन् पेशाने डॉक्टर असलेला पती हैवान झाला. ही धक्कादायक घटना हुकडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीय. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याला चोरीचा बनाव करत चोरांनी पत्नीची हत्या केल्याचं भासवण्याचा प्रयत्न हैवान डॉक्टरने केला. परंतु पोलिसांनी काही दिवसात आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या.
अर्चना राहुल, असं पन्नास वर्षीय मृतक महिलेचे नाव आहे. त्या नागपूरच्या मेडिकल कॉलेज येथे सहाय्य प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. तर आरोपी पतीचं नाव डॉ.अनिल राहुले असे आहे. ते रायपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी 12 एप्रिल डॉ. अनिल राहुले हे संध्याकाळी घरी आले. त्यावेळी घरातून दुर्गंधी येत होती.
घरात गेल्यावर बेडजवळ अर्चनाचा मृतदेह पाहताच ते रडायला लागले. घरातील परिस्थितीची माहिती आरोपीने शेजारच्यांना सांगितलं. पत्नीचा मृतदेह पाहून डॉक्टर रडत होते. त्यानंतर शेजाऱ्यांनी हुडकेश्वर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सुरुवातीला अनिलने चोरी झाली असावा असा बनाव करत स्वतः रडत निर्दोष असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळ पाहता पोलिसांना पती अनिलच्या देहबोलीवर संशय आला. यातूनच पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत संपूर्ण घरात शोध घेतल. अर्चनाचा फोन तपासला.अनिलला ताब्यात घेत पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याने हत्येची कबुली दिली.
आरोपी अनिल हा नेहमी अर्चनाच्या चारित्र्याचा संशय घेत होता.यामुळे त्यांचे अनेकदा भांडण झाले. अनिल हा शनिवारी रविवारी रायपूरवरून सुट्ट्यांमध्ये नागपुरात येत होता. त्यामुळे त्याने रायपुरमध्ये या सगळ्या घटनेचा कट रचला.
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांचे अनेकदा भांडण होत होते. अनिल हा शनिवारी रविवारी रायपूरवरून सुट्ट्यांमध्ये नागपुरात येत होता. त्यामुळे त्याने रायपुरमध्ये या सगळ्या घटनेचा कट रचला.
अनिलने हत्येचा कट रचत 9 एप्रिलला अनिल हा त्याचा भाऊ राजू राहुलेसोबत आला. त्या दोघांनी घरात शिरून रॉडने अर्चनाच्या डोक्यावर वार करत हत्या केली. त्यानंतर घराला लॉक लावून तेथून पसार झाले. 12 तारखेला रात्री घरी परत आले. जणू आपल्याला काही माहिती नसल्याचे बनाव करत अर्चनाचा मृतदेह पाहून रडायला सुरुवात करत केली.
पती अनिल राहुले हा उच्च शिक्षित असून छत्तीसगढ येथे रायपूरमध्ये मेडिकल इन्स्टिट्यूट प्रोफेसर होता. अनिल हा अर्चनाच्या चारित्र्य संशय घेत होता. यासाठी त्याने घरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवत होता. घरी कोणत्याच नातेवाईकास येण्याची परवागी नव्हती. याशिवाय पती पत्नीमध्ये संशयावरून नेहमी भांडण होत होते. मृतक अर्चनाचा मोबाईल तपासल्यावर तिच्या मोबाईलमध्ये छोट्यातली छोटी अपडेट पतीला व्हाटसअँपवर देत होती. घटनेच्या दिवशी अर्चनाही घरात एकटीच होती. अर्चना आणि अनिलला मुलगा आहे. तो तेलंगणा येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.