Crime News: संतापजनक! कामाच्यानिमित्त घरी बोलवयाचे अन् ...; १३ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; ८ जणांना अटक

Minor Old Girl Physically Abused: एका १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना सिक्कीममध्ये घडलीय. या प्रकरणात पोलिसांनी ८ जणांना अटक केलीय. त्यापैकी ४ आरोपी अल्पवयीन आहेत.
crime news
Uttar Pradesh Crimegoogle
Published On

सिक्कीमच्या ग्यालशिंग जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडलीय. एका १३ वर्षीय मुलीवर १२ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार झाल्याची बाब उघडकीस आलीय. आरोपीने पीडितेला धमकी देत तिच्यावर वर्षभरापासून अत्याचार केला. या प्रकरणात पोलिसांनी ८ जणांना अटक केलीय. त्यापैकी ४ आरोपी अल्पवयीन आहेत. बाल कल्याण समितीच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलीय.

crime news
Body Massage: बॉडी मसाजच्या नावाखाली 'डर्टी गेम', तरूणींचे अश्लील फोटो काढायचे, व्हायरल करण्याची धमकी देत पैसे लुबाडायचे

कसा उघडकीस आला गुन्हा

पीडित मुलगी नेहमी आजारी असायची आणि अशक्त राहत असायची. त्यामुळे शाळेत तिचं समुपदेश करण्यात आलं. त्यावेळी मुलीने तिच्यावर घडलेल्या अतिप्रसंगाची माहिती दिली. त्यानंतर बाल कल्याण समितीने पोलिसात अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली.

घरकामासाठी बोलवायची आणि...

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नेहमीच आजारी दिसणाऱ्या मुलीचे समुपदेशन करण्यात आले, तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. समुपदेशन करताना पीडित मुलीने एका महिलेचं नाव घेतलं. ही महिला पीडित मुलीला घरी बोलवत असायची त्यानंतर तिच्यावर अत्याचार करत असायची.

crime news
Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवत सोबत नेलं, ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार नंतर हत्या; एन्काउंटरमध्ये आरोपी ठार

कामाच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करायची. ही महिला पीडित मुलीला तिच्या नवऱ्यासोबत लैंगिक संबंध करण्यास भाग पाडत, असा आरोप पीडितेने केलाय. महिलेच्या पतीनंतर पीडितेवर इतर दोन जणांसोबतही लैंगिक संबंध ठेवण्यास दवाब टाकण्यास भाग पाडलं. नंतर महिलेने त्या दोन लोकांकडून लैंगिक संबंधाच्या मोबदल्यात पैसे घेतले गेले. चौकशीदरम्यान मुलीने गेल्या एक वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चार आरोपींची नावेही सांगितली.

यानंतर बाल कल्याण समितीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. अल्पवयीन मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी महिला, तिचा पती आणि दोन पुरुषांना अटक केलीय. चार अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. ही मुलगी सध्या बाल कल्याण समितीकडे आहे आणि तिला योग्य समुपदेशन आणि वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com