Walmik Karad : वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो, गँग मेंबरच करतील गेम; तृप्ती देसाईंचा मोठा दावा

Walmik Karad Encounter Ranjit Kasle Viral Video : रणजित कासले यांच्या दाव्यानंतर बीडमधील प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील या प्रकरणाबाबत मोठा दावा केला आहे.
Valmik Karad murder in jail
Valmik Karad murder in jailSaam Tv News
Published On

बीड : बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केलेल्या दाव्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा रणजीत कासले यांनी केला आहे. कासले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा दावा केला आहे. ५० कोटींची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कासले यांच्या या दाव्यानंतर बीडमधील प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्याचदरम्यान, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील या प्रकरणाबाबत मोठा दावा केला आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, 'वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो, असं एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. ते अधिकारी किती खरं बोलतात, किती खोटं बोलतात? हे माहिती नाही. पण परंतु वाल्मिक कराडचा एन्काऊंटर किंवा खून होऊ शकतो, याची भीती मी आधीच व्यक्त केली होती. आतासुद्धा मोठमोठे मोहरे जे आहेत त्यांचं नाव वाल्मिक कराड घेऊ शकतो. त्यामळे अनेकांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. वाल्मिक कराडच्या जवळचे लोकंच त्याच्या एन्काऊंटर करण्याची सुपारी देऊ शकतात', असा खळबळजनक दावा देसाई यांनी केलाय.

Valmik Karad murder in jail
मृतदेह त्यांना लपवायचा होता, त्यांनी एक महिला...; संतोष देशमुख हत्या प्रकरणात ग्रामस्थांचा पोलिसांवर गंभीर आरोप

'वाल्मिक कराडला स्लिपअॅप्निया नावाचा आजार असल्यामुळे तो जोपर्यंत बीड जिल्हा कारागृहात आहे, तिथे त्याला ज्याप्रकारे VIP वागणूक मिळते, तसंच स्लिपअॅप्निया आजारामध्ये श्वास घ्यायाल त्रास होतो, श्वास घ्यायला माणूस विसरतो. त्याचं मशीन काढलं जाऊ शकतं आणि पोलीस कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत आढळला, अशा प्रकारची पोलीस घोषणा करु शकतात'.

'वाल्मिक कराडला कधीही मारलं जाऊ शकतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला जर मारुन टाकलं तर ही केस पूर्णपणे संपू शकते, त्यामुळे त्याचा एन्काऊंटर कधीही होऊ शकतो. तसंच रणजीत कासले यांचं खरं असेल, तर त्यांना कधी सुपारी दिली आणि कोणी दिली? त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना का नाही सांगितलं. याचीही चौकशी होणं गरजेचं आहे', असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

Valmik Karad murder in jail
Local: हार्बर मार्गावर लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांची प्रचंड गैरसोय, वैतागून रूळावरून पायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com