Nagpur Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : ८ महिन्याच्या गरोदर महिलेला संपवलं अन् मृतदेह फेकला, दुर्गंधी सुटल्याने घटना आली समोर

Nagpur Crime News : नागपूरमध्ये आठ महिन्यांच्या गरोदर महिलेची गळा दाबून हत्या करून मृतदेह झुडपात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिलेची ओळख पटली नसून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नागपूरमध्ये आठ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या करण्यात आली आहे.

  • या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत झुडपात सापडला.

  • मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

  • नागपूर पोलिसांकडून तपास सुरू असून शहरात खळबळ उडाली आहे.

नागपूरमध्ये गरोदर महिलेची हत्या करून तिला रस्त्याच्या कडेला फेकले असल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने शहरातील नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. धक्कदायक म्हणजे या महिलेची हत्या होऊन २ दिवस उलटून गेले आहेत. नागपूर पोलीस आणि हितजोती आधार फाउंडेशनच्या सहकार्याने या मृत महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले.

मिळलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन हद्दीच्या पाटणसावंगी पोलीस चौकी अंतर्गत सावरमेंढा शिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. धक्कदायक म्हणजे ही महिला आठ महिन्यांची गरोदर होती. या महिलेची हत्या करून रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात फेकून देण्यात आले होते. मात्र मृतदेह कुजून त्याची दुर्गंधी सुटल्याने आजूबाजूच्या नागरिकांचा संशय बळावला. त्यांनी आजूबाजूला पहिले असता त्यांना झुडपात महिलेचा मृतदेह आढळला.

क्षणाचाही विलंब न करता स्थानिकांनी पोलिसांना कळवले. स्थानिकांच्या माहितीनुसार नागपूर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले. तसेच नागपूर येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणारी आधार फाउंडेशन टीम देखील घटनास्थळी पोचली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत शवविच्छेदन करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची हत्या गळा दाबून करण्यात आली आहे. तसेच ही हत्या होऊन दोन दिवस उलटले आहेत. मृतदेहाची अद्यापही ओळख न पटली नसून या महिलेवर हितजोती आधार फाउंडेशनच्या सहकार्याने पोलिसांनी अंतिम संस्कार केले. दरम्यान मृतदेहाची ओळख न पटल्याने नेमका ही महिला आहे तरी कोण? हे नागपूर पोलिसांसमोर मोठे आवाहन ठरले आहे. तसेच या महिलेची हत्या का व कोणी केली ? याचा तपास नागपूर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT