Maharashtra Politics : औरंगजेब देशाचे बादशाह, आंबेडकरांसमोर वंचितच्या नेत्याकडून वक्तव्य, नेमकं काय म्हणाले माजी आमदार?

Akola News : अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विराट सभा पार पडली. या सभेत माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी औरंगजेबाच्या मजारीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. खतीब यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics : औरंगजेब देशाचे बादशाह, आंबेडकरांसमोर वंचितच्या नेत्याकडून वक्तव्य, नेमकं काय म्हणाले माजी आमदार?
Akola NewsSaam Tv
Published On
Summary
  • अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विराट सभा पार पडली.

  • या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी RSS आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

  • माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी औरंगजेबाच्या मजारीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

  • या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विराट सभा पार पडली. ही सभा गेल्या ४२ वर्षांपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजन करण्यात येते. ॲड. प्रकाश आंबेडकर हे या मेळाव्याला सलगपणे संबोधित करण्याची परंपरा आहे. या सभेदरम्यान माजी आमदार नातिकोद्दीन खतीब औरंगजेबाच्या मजारीचा मुद्दा उपस्थित केला. खतीब यांच्या या वक्तव्यावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला. याच मेळाव्यात भाषण करताना वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी औरंगजेबाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

Maharashtra Politics : औरंगजेब देशाचे बादशाह, आंबेडकरांसमोर वंचितच्या नेत्याकडून वक्तव्य, नेमकं काय म्हणाले माजी आमदार?
मुंबईचा बिलेनियर भिकारी! दादरच्या शिवाजी पार्कजवळ घर, ठाण्यात २ दुकाने, २ फ्लॅट; वाचा डोळे विस्फारून टाकणारी स्टोरी

हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी औरंगजेबाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रकाश आंबेडकरांमुळेच खुलताबाद मधील औरंगजेबाची कबर वाचल्याचं ते म्हणाले. खतीब वंचितच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. ते विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून वंचितमध्ये आलेत. वंचितने त्यांना अकोला जिल्ह्यातील बाळापुरमधून पक्षाची विधानसभेची उमेदवार दिली होतीय. त्यात ते ७१ हजार मतांनी पराभूत झाले. खतीब यांनी औरंगजेबाच्या केलेल्या गौरवपूर्ण उल्लेखावरून राज्याच्या राजकारणात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics : औरंगजेब देशाचे बादशाह, आंबेडकरांसमोर वंचितच्या नेत्याकडून वक्तव्य, नेमकं काय म्हणाले माजी आमदार?
Crime News : जंगलात नेलं, गळा दाबला, प्रेमप्रकरणातून अल्पवयीन तरुणीची हत्या; कुडाळमध्ये आरोपीला बेड्या

नेमकं नातिकोद्दीन खतीब काय म्हणाले?

महाराष्ट्रमध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वी एक मागणी जोर धरू लागली. राज्यातून औरंगजेबाच्या मजारी मुद्दा चर्चेत आला होता. औरंगजेबाची मजारी हटवण्यात यावी, आणि दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी. अशी मागणी होऊ घातली होती. त्यानंतर राज्यासह देशभरातलं वातावरण तापलं होतं. हे सर्व होत असताना प्रकाश आंबेडकर हे एकमेव समोर आले. आणि औरंगजेबाच्या मजारीला फुल चढवत म्हणाले की औरंगजेब या देशाचे बादशाह होते. ५० वर्षे या ठिकाणी त्यांनी हुकमत केली. औरंगजेबाच्या मजारीला कोण हात लावतं, ते आम्ही बघतो. त्यानंतर देशात शांतता पसरली. त्यावेळी आमच्याकडं लक्ष दिल्याने जातीवादी ताकदीच तोंड बंद झालं आहे. त्यामुळे आज आंबेडकरांसोबत राहायला पाहिजे, तेच होते जे सर्वांसमोर आले. असे माजी आमदार नातिकोद्दीन म्हणाले.

Maharashtra Politics : औरंगजेब देशाचे बादशाह, आंबेडकरांसमोर वंचितच्या नेत्याकडून वक्तव्य, नेमकं काय म्हणाले माजी आमदार?
Crime News : रक्षकच भक्षक! आईच्या डोळ्यासमोर मुलीवर बलात्कार, २ पोलिसांचा काळा कारनामा, राज्यात खळबळ

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल

अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विराट सभा आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्यात भाषण करताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, "महिन्यातून एकदा अकोल्यात येणाऱ्या मोहन भागवतांनी अकोल्यापासून ३५ किलोमीटर अतंरावर असणाऱ्या शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन का घेतलं नाही? गजानन महाराज सर्वसामान्य ओबीसींच श्रद्धास्थान असल्याने त्यांनी दर्शन घेतलं नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com