Nagpur Crime Saam Tv
क्राईम

Nagpur Crime : मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने आईचं जीवन संपवलं; भावाच्या संशयाने सापडला मारेकरी भाऊ

Bharat Jadhav

Nagpur Crime :

आई आणि मुलाचं नातं खूप वेगळं असतं. परंतु नागपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे या नात्याला काळिमा फासला गेला. शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हत्येची घटना घडली. क्षुल्लक कारणावरून मुलाने आपल्या आईचा जीव घेतला. हे क्षुल्लक कारण होतं, मोबाईल.(Latest News)

हल्ली मोबाईलचं अनेकांना व्यसन लागले आहे. मोबाईल नसला तर अनेकांना बेचैन होत असते. नागपूरमधील आई देखील मोबाईलची बळी ठरली. एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने आईने मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आईची हत्या केलीय. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येची घटना १८ ऑक्टोबर रोजी घडली होती. पोस्ट मॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतरग महिलेची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी मुलाविरुद्धात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. कमलाबाई गुलाबराव बडबाईक असं मृत महिलेचं नाव आहे. १८ ऑक्टोबर रोजी कमलाबाई यांचा मुलगा दीपक गुलाबराव बडबाईक याला त्यांची तब्येत खराब असल्याची माहिती मिळाली. कमलाबाई यांना त्यांचा मोठा मुलगा हा दवाखान्यात घेऊन गेल्याचं दीपकला सांगण्यात आलं.

दीपक यांच्या मोठ्या भावाचं नाव रामनाथ बडबाईक असं आहे. रामनाथ याने त्याच्या आईला रुग्णालयात दाखल केल्याचं दीपकला कळालं. त्यानंतर काहीवेळेतच आईचा मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या कानी आली. त्यानंतर दीपकने घरी धाव घेतली. तेव्हा आईच्या गळ्यावर जखमा दिसून आल्या. त्याच्या आईच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला शाई लागल्याचे दिसलं. तसेच त्यांच्याकडचे दागिनेही दिसत नव्हते.

हे सर्व पाहून दीपकने त्यांच्या मोठ्या भावाकडे विचारणा केली. परंतु त्याने व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे दीपकला रामनाथचा संशय आला. त्यानंतर दीपकने हुडकेश्वर पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला होता. गळा दाबल्यामुळेच दीपक यांच्या आईचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी रामनाथ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबूली दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT