meerut case  Saam tv
क्राईम

Shocking : आधी नवऱ्याच्या मृतदेहाचे १५ तुकडे, नंतर बायकोची होळीला रंगाची उधळण; बॉयफ्रेंडचा वाढदिवसही केला साजरा, VIDEO आला समोर

sahil muskan video : आधी साहिलच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले. त्यानंतर बायकोने होळीच्या दिवशी रंगाची उधळण केली. तसेच बॉयफ्रेंडचा वाढदिवसही साजरा केला.

Vishal Gangurde

मेरठमध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या करणाऱ्या मुस्कानचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तिने पती सौरभची निर्घृण हत्या केल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत होळी साजरी केली. सौरभची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले. त्यानंतर बॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा केला. साहिल आणि मुस्कानने एकत्र होळी आणि वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

मुस्कानने साहिलच्या वाढदिवशी त्याला सरप्राइज गिफ्ट दिलं. साहिल आणि मुस्कानचा होळी आणि वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. केक मागवण्यासाठी मुस्कानने कॅब ड्रायव्हरसोबत केलेलं संभाषण व्हायरल झालं आहे. कॅब चालकाच्या म्हणण्यानुसार, साहिलबरोबर मुस्कान देखील दारुचं सेवन करत होती. मेरठहून हिमाचलला जाताना आणि परतीच्या प्रवासादरम्यान दोघांनी दारुचं सेवन केलं.

मुस्कान आणि साहिलचा होळी खेळतानाचा २० सेकंदचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही नशेत गुंग असल्याचे दिसत आहेत. दोघांनी तीन आणि चार मार्चच्या रात्री सौरभची हत्या केली. त्यानंतर जवळपास १० दिवसांनी म्हणजे १४ मार्च रोजी होळी साजरी केली. घरात सौरभच्या मृतदेहाचे तुकडे होते. तर दुसरीकडे दोघेही होळी खेळण्यात दंग होते.

दोघांचा दुसरा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुस्कान साहिलचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. साहिलचा होळीनंतर म्हणजे १६ मार्च रोजी वाढदिवस होता. मुस्कानने शिमलाच्या हॉटेलमध्ये साहिलचा वाढदिवस साजरा केला. या व्हिडिओमध्ये मुस्कान साहिलला किस करताना दिसत आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी मुस्कानने कॅब ड्रायव्हरला फोन करून केक मागवला. मुस्कानने कॅब ड्रायव्हरला व्हॉट्सअॅपवर ऑडिओ मेसेज पाठवला होता.

मुस्कनने ड्रायव्हरला सांगितलं की, कुठूनही केक घेऊन ये'. केक मिळाल्यानंतर फक्त मेसेज करून सांगण्यासही सांगितलं. केक घेऊन आल्यानंतर रुमवर येण्यास सांगितलं. मुस्कानला वाढदिवस साजरा करून साहिलला सरप्राइज द्यायचं होतं. कॅब ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, दोघेही दिवसाला दारुच्या तीन बाटल्या प्यायचे. हिमाचलला परतल्यानंतर रस्त्यात उतरून दारु विकत घेतली. त्यानंतर दोघांनी एकत्र दारुचं सेवन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT