१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ मंदिर आहे. हे भगवान शंकराचे मंदिर आहे. तसेच हे मंदिर पर्वतरांगांनी वेढलेले आहे.
उत्तराखंडातील बद्रीनाथ हे भगवान विष्णूला समर्पित आहे. येथे पर्यटक आवर्जून येतात.
गंगोत्री -यमुनोत्री हे गंगा आणि यमुना नद्यांचे उगमस्थान आहे. गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्या आहेत.
हेमकुंड साहिब हे तीर्थक्षेत्र सात बर्फाच्छादित शिखरे आणि हिमनदी सरोवराने वेढलेले आहे.
कटराजवळील त्रिकुटा पर्वतामध्ये एका गुहेत वैष्णो देवी मंदिर वसलेले आहे. जम्मू आणि काश्मीरचा निसर्ग पाहायला येणारे पर्यटक येथे आवर्जून जातात.
असे बोले जाते की, अमरनाथ हे ठिकाण भगवान शिवाने देवी पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते. इथला निसर्ग स्वर्ग सुखाची अनुभूती देतो.
संध्याकाळच्या गंगा आरतीसाठी ऋषिकेश प्रसिद्ध आहे. ऋषिकेशला तुम्ही कुटुंबासोबत तुम्ही पिकनिक देखील प्लान करू शकता.
उत्तराखंडच्या सीमेजवळ कैलास पर्वत आहे. हे भगवान शिवाचे स्थान आहे. याच्या जवळच जगातील पवित्र मानसरोवर तलाव देखील आहे.
उत्तराखंडातील हरिद्वार हे पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे अनेक मेळावे आणि सोहळे पाहायला मिळतात. आयुष्यात एकदा तरी या सर्व ठिकाणांची आवर्जून सफर करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.