Mumbai News Yandex
क्राईम

Mumbai News: रील बनवणं बेतलं जीवावर, खाडीच्या पुलावरून पडून तरूणाचा मृत्यू

Youth Death While Making Reel: अलीकडे सगळ्यांनाच रील बनवण्याचं वेड लागलंय. पण अनेकदा रील बनवणं जीवावर बेतु शकतं, अशीच एक घटना मुंबईतुन समोर आली आहे.

Rohini Gudaghe

Youth Death While Making Reel In Mumbai

अलीकडे सोशल मीडियाची क्रेझ वाढत आहे. सोशल मीडियावर रील्स बनवून प्रत्येकजण प्रसिद्धी मिळवत आहे. अनेकांचा तर तो आवडीचा छंद बनला आहे. अनेकजण रील स्पेशल बनवण्यासाठी वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा हे स्टंट जीवघेणे देखील असू शकतात. अशीच एक घटना मुंबईतुन (Mumbai) समोर आली आहे. नक्की आपण ही घटना काय आहे, ते पाहु या. (Latest Crime News)

सध्या मोबाइलवर ‘रील्स’ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. समाजमाध्यमावर मिळणाऱ्या लाईक्स प्रतिष्ठेशी जोडल्या जात आहेत. यातूनच अनेकजण धोक्यात घालून रिल्स बनवत (Youth Death) आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. मुंबईमध्ये रील बनवणं एका तरूणाच्या जीवावर बेतलं आहे. त्याचा खाडीच्या पुलावरून पडून मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रील बनवणं बेतलं जीवावर

रोहित मौर्य नावाचा तरूण आपलं रील शुट करण्यासाठी मित्रांसोबत माणकोली- मोठागाव (डोंबिवली) येथील खाडीवर गेला (Mumbai News) होता. रील बनवत असताना त्याने खाडीवरून अचानक पाण्यात उडी मारली. खाडीच्या पाण्यात बुडून या तरूणाचा मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने 2 दिवसांनी त्याचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला.

रोहितच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘रील्स’ तयार करताना पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली (Youth Death While Making Reel) आहे. सोशल मीडियासाठी केले जाणारे स्टंट अनेकदा जीवघेणे ठरतात.

पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित मौर्य ( वय 25, मेहनगर, आझमगड, उत्तर प्रदेश) हा त्याच्या आई-वडिलांसोबत साईनगर, कामतघर येथे राहत (Social Media Reel) होता. त्याचे वडील अशोक मौर्य यांचे किराणा मालाचे दुकान आहे. रोहितला रील बनवण्याची आवड होती. तो नेहमी वेगवेगळे रील बनवत होता.

असंच एक रील व्हिडिओ शुट करण्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी तो मित्रांसह मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माणकोली-मोठागाव खाडी पुलावर (Dombivli Mankoli Bridge) गेला होता. गणेश घाटाजवळ तो रील बनवत होता. रील बनवताना अचानक त्याने खाडीत उडी घेतली. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT