Andreas Brehme Death: फुटबॉल विश्वाला मोठा धक्का! वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Footballer Death News: वर्ल्डकप १९९० मध्ये अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या सामन्यात एकमेव गोल करत वेस्ट जर्मनीला चॅम्पियन बनवणाऱ्या एंड्रीयास ब्रेहमे (Andreas Brehme Death) यांचे निधन झाले आहे.
Andreas Brehme
Andreas Brehmesaam tv news
Published On

Andreas Brehme Death News In Marathi:

वर्ल्डकप १९९० मध्ये अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या सामन्यात एकमेव गोल करत वेस्ट जर्मनीला चॅम्पियन बनवणाऱ्या एंड्रीयास ब्रेहमे (Andreas Brehme Death) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची पार्टनर सुजेन शेफर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत त्यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. शेफर यांनी म्हटले की, ' एंड्रीयास ब्रेहमे यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.'

बायर्न म्युनिक क्लबने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या क्लबने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ' एंड्रीयास ब्रेहमे सदैव आमच्या हृदयात राहतील. एक वर्ल्डकप विजेता आणि मुख्य म्हणजे एक खास व्यक्ती म्हणून ते नेहमीच आमच्या हृदयात राहतील.' १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी जर्मनीसाठी दमदार खेळ केला. १९९० मध्ये ज्यावेळी जर्मनीने वर्ल्डकपवर नाव कोरलं, त्या विजयातही एंड्रीयास ब्रेहमे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. (Sports news marathi)

Andreas Brehme
IND vs ENG 4th Test, Team India Squad: चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहसह प्रमुख फलंदाज बाहेर! असा आहे संपूर्ण संघ

सेमीफायनलमध्येही केला होता गोल..

एंड्रीयास ब्रेहमे हे फुटबॉल विश्वात गाजलेलं नाव आहे. एंड्रीयास ब्रेहमे यांनी १९९० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलमध्येही इंग्लंडविरुद्ध खेळताना गोल केला होता. हा सामना वेस्ट जर्मनीने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर फायनलमध्ये वेस्ट जर्मनी आणि अर्जेंटीना हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यातील ८५ व्या मिनिटाला गोल करत एंड्रीयास ब्रेहमे यांनी जर्मनीला चॅम्पियन बनवलं होतं. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी यूनिफाईड जर्मनी आणि वेस्ट जर्मनीसाठी ८६ सामने खेळले. क्लब लेव्हल खेळताना त्यांनी २ वेळेस जर्मन पुरस्कार जिंकला होता. १९८७ मध्ये त्यांनी बायर्नकडून खेळताना तर १९९८ मध्ये कॅसरस्लॉटर्नकडून खेळताना चॅम्पियनशिप जिंकली होती.

Andreas Brehme
Virat-Anushka Baby: विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा झाल्याचा पाकिस्तानात जल्लोष! मिठाई वाटून साजरा केला आनंद -Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com