Mumbai Crime 
क्राईम

Mumbai Crime: एटीएममध्ये पैसे भरण्यास आलेल्या तरुणाला पोलीस शिपायानेच लुटलं?

Bharat Jadhav

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईतील गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे काम मुंबई पोलीस करत असतात मात्र मुंबई पोलीस दलात सेवेत असलेल्या पोलीस शिपायानेच आपल्या अन्य 3 साथीदारांच्या मदतीने एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीस लुटल्याची घटना घडली. ही घटना मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडे एसवी रोड परिसरात घडली. या गुन्हात सहभागी असलेल्या पोलीस शिपायाला नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आले आहे.

मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडे एस वी रोड परिसरातील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या तरुणाला लुटण्याची घटना दीड महिन्यापूर्वी घडली. या लुटीमध्ये फिर्यादींची 3 लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. यातील एक आरोपी हा मुंबई पोलीस दलात सेवेत असून तो खार पोलीस ठाणे येथे कार्यरत होता. याप्रकरणी अटक झाल्यानंतर पोलीस शिपाई नितीन तानाजी पाटील याला निलंबित करण्यात आले होते. खात्याअंतर्गत चौकशी करून अखेर काल त्याला पोलीस दलातून बडतर्फ देखील करण्यात आले आहे.यामुळे पोलीस दलाची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे.

मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी महिलेने निवडला चोरीचा मार्ग

धावत्या लोकलमध्ये महिलेची चैन हिसकावणाऱ्या एका महिलेला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली होती. महिलेला तिच्या नवऱ्याने सोडून दुसरे लग्न केले. यामुळे संसार उघड्यावर पडला. चार मुलांची जबाबदारी असल्याने हाताला मिळेल ते काम ही महिला करत होती.

तरी देखील पैशांची चणचण भासत असल्याने चोरीचा मार्ग पत्करला. त्यातच तिला आजारपण जडले. उपचारासाठी तिने मुंबई गाठली. मात्र मुलाच्या कॉलेजची फी भरायची असल्याने तिने पुन्हा धावत्या लोकलमध्ये एका महिलेची चैन हिसकावली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT