Santacruz Crime News Saam tv
क्राईम

Mumbai News: यूट्युबवरुन चोरीची आयडिया घेतली, एटीएममध्येही गेला; मात्र तरुणाचा डाव फसला अन् आयुष्यच बर्बाद झालं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Crime News

डिजिटल युगात चोरीच्या प्रकारांमध्येही बदल होत आहेत. गुन्हेगार चोरीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरताना दिसत आहे. यासाठी यूट्युबचा देखील वापर केला जातो आहे. अशीच एक घटना मुंबईच्या सांताक्रुजमधून समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सांताक्रूजमध्ये एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची एक घटना समोर आली आहे. या चोरीसाठी आरोपीने युट्यूबवर व्हिडीओ तसेच अनेक चित्रपटातील आयडियांचा आधार घेतला आहे. मात्र त्याचा एटीएममध्ये चोरीचा हा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय आरोपी जावेद शेख याला अटक केली. आरोपी जावेद हा पालघरचा रहिवाशी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ पूर्व येथे १ एप्रिल रोजी संध्याकाळी एटीएम चोरीची घटना उघडकीस आली होती. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपी जावेद एटीएममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. त्यानंतर जावेदने कटरच्या साहाय्याने वारंवार एटीएम मशीन उघडण्याचा प्रयत्न करतो. मात्र कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन उघडणे त्याला शक्य होत नाही. अखेर वैतागून जावेद एटीएममधून पळ काढतो.

एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचे संबंधित बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. वाकोला पोलिसांनी तात्काळ एटीएमच्या परिसरातील साधारण ७०-८० सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहिले. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीने जावेदने सुरुवातील गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. पोलिसांना कसून चौकशी केली असता त्यानेच चोरीचा प्रयत्न केल्याचं मान्य केलं. याप्रकरण जावेदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेदवर याआधी या प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT