Mumbai police  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime : सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; नेपाळहून मुंबईत आलेल्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार

Mumbai Crime News : सोशल मीडियावरील मैत्रीचा गैरफायदा घेऊन २२ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Vishal Gangurde

Mumbai Crime News :

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील मैत्री एका १५ वर्षीय नेपाळी मुलीला महागात पडली आहे. सोशल मीडियावरील मैत्रीचा गैरफायदा घेऊन २२ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

एका महिन्यांपूर्वी २२ वर्षीय तरुणाची सोशल मीडियावर नेपाळमधील १५ वर्षीय मुलीची ओळख झाली. त्यांनी एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाण घेवाण केली. त्यानंतर दोघांनी चॅटिंग सुरु केली. या तरुणाने मुलीला लग्नाचे आश्वासन दिलं आहे. त्याने या मुलीला महाराष्ट्रात बोलावलं.

नेपाळमधील या मुलीने तिच्या या मैत्रीविषयी कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली नाही. या तरुणाने मुलीला धमकी दिली की, तू महाराष्ट्रात नाही आली, तर मी जीवन संपवेल. त्यानंतर मुलीने एकट्याने मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, नेपाळमधील मुलगी ही नेपाळवरून बसने १७ मार्चला उत्तर प्रदेशच्या गोरखपूरला पोहोचली. त्यानंतर गोरखपूरवरून ही तरुणी ट्रेनने १९ मार्चला कल्याणला पोहोचली. त्यानंतर आरोपीची पीडित मुलीसोबत कल्याण रेल्वे स्टेशनला भेट झाली. त्यानंतर या तरुणाने तिला रिक्षाने मुंब्रा येथील भाडेतत्वावरील एका घरात नेलं. या घरात तरुणाने या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर या तरुणाने मुलीला दिवा स्टेशनला सोडलं. (Mumbai Crime News)

पीडित मुलगी दिव्यावरून दादरला पोहोचली. या प्रवासादरम्यान, प्रवासी व्यक्तीला तिच्यासोबत विपरीत झाल्याचे कळाले. या व्यक्तीने पीडितेला सार्वजनिक रुग्णालयात दाखल केलं.

आरोपीने पीडित मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला. मात्र, या मुलीला तिचा नंबर लक्षात होता. यामुळे पोलिसांनी मोबाईल ट्रेस करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपी तरुण वडाळ्याचा असून त्याने पीडित मुलीच्या मोबाईलमधील सर्व चॅट डिलीट केले आहेत. हे प्रकरणी मुंब्रा पोलिसांकडे वळविण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Akola Mayor: अकोल्याला आज महापौर मिळणार, कोण बसणार खुर्चीवर? भाजप सत्ता कायम राखणार का?

Panchang Today: आज शुक्र प्रदोष व्रताचा संयोग! मिथुनसह चार राशींसाठी लाभदायक दिवस

Shahrukh Khan: चष्मा काढायला लावला, आयडी बघितला...; एयरपोर्टवर किंग खानची झाली चेकिंग, नेमकं कारण काय?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! १२ फेब्रुवारीला मोठा निर्णय होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT