Man blackmails woman with her intimate photos Saam Tv
क्राईम

Crime News: गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे नको ते व्हिडिओ; बायकोचे ते व्हिडिओ पाहून घेतला टोकाचा निर्णय

Mumbai Crime: मुंबईत प्रेमाच्या नावाखाली तरुणीचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीने ते व्हिडिओ नवऱ्याला पाठवून तिचा संसार उद्ध्वस्त केला.

Shruti Vilas Kadam

Crime News: मुंबई मध्ये प्रेमसंबंधांच्या नावाखाली फसवणूक, लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका २६ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करत आरोपीने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची २०२५ साली मुश्फिक हुसैन नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने प्रेमाचे नाटक करत तिच्याशी जवळीक साधली आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या काळात त्याने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ठेवले.

दरम्यान, कुटुंबीयांनी तरुणीचे दुसऱ्या युवकासोबत लग्न लावून दिल्यानंतर आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला. त्याने त्या फोटो-व्हिडिओंचा आधार घेत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपीने तिच्यावर पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकत, नकार दिल्यास हे व्हिडिओ तिच्या पतीला पाठवण्याची धमकी दिली.

अखेर आरोपीने धमकी प्रत्यक्षात उतरवत संबंधित व्हिडिओ तिच्या नवऱ्याला पाठवले. या घटनेमुळे पीडितेचा संसार सुरू होण्यापूर्वीच तुटला. यानंतरही आरोपी थांबला नाही. पतीपासून वेगळी झालेल्या तरुणीला पुन्हा लग्नाचे आश्वासन देत त्याने तिचे शोषण सुरूच ठेवले.

मात्र, जेव्हा तरुणीने लग्नासाठी आग्रह धरला, तेव्हा आरोपीने नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारामुळे मानसिक आणि भावनिक त्रास सहन करत अखेर पीडितेने धैर्य दाखवत महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुश्फिक हुसैन याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT