Honey Bee Attack: जागतिक वारसा स्थळ असलेल्या व जगप्रसिद्ध असलेल्या वेरूळ लेणी परिसरात रविवारी (दि. ३)रोजी सकाळी पर्यटकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली.या मधमाशांनी जवळ पास ६० ते १०० पर्यटकांना चावा घेतला, यात एक महिला गंभीर जखमी असून, यामुळे लेणी परिसरात पळापळ आणि धांदल उडाली.
रविवारची सुट्टी असल्याने भर उन्हाळ्यात देखील देशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती, सकाळी दहाच्या दरम्यान लेणी क्रमांक १० व १६ पाहत असताना हा प्रकार घडल्याने पर्यटकांनी सैरवैर धाव घेतली व काही काळ लेणी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लेणीमध्ये पर्यटकांची गर्दी असताना मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला केला.
या हल्ल्यामुळे पर्यटक घाबरून लेणीबाहेर पळू लागले. लहान मुले व वृद्ध पर्यटकांना बाहेर काढताना मोठी तारांबळ उडाली. स्थानिक गाईड व हॉकर्स यांनी तातडीने मदत करत व लेणी सुरक्षा रक्षक यांनी सावधगिरी बाळगत सर्वांना सुरक्षित बाहेर काढली.
यापूर्वी लेणी क्र.१६ मध्ये मधमाशांचे पोळे होते.पुरातत्व विभागाने ते काढून टाकल्याने हल्ल्यांचे प्रमाण थांबले होते. मात्र वर्षभरानंतर आज पुन्हा क्र. १६मध्ये व १० जवळ हल्ला झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
यातील जखमी पर्यटक उत्तर भारतीय होते, यातील जास्त जखमी पर्यटकांना वेरुळ येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ नेण्यात आले, काहींनी खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले, तर काही रुग्ण छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेवून पुढे मार्गस्थ झाले जग प्रसिध्द वेरुळ लेण्या या डोंगरकुशीत असून, दाट झाडी, थंडावा यामुळे मधमाशां लेणीमध्ये पोळे बनवतात, मात्र याच मधमाशां पर्यटकांवर हल्ले करण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.