Mumbai Fraud Saamtv
क्राईम

Mumbai Fraud: स्वस्तातील चारधाम यात्रा पडली महागात; 'ट्रॅव्हल्स एजेंटकडून शेकडो नागरिकांची फसवणूक; प्रकरण काय?

Kandivli Crime News: स्वस्तात चारधाम यात्रेचे आमिष दाखवून लाखो रुपये घेवून ट्रॅव्हल्स एजेंट फरार झाल्याचे उघडकीस आले.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी

Kandivli Fraud News:

लोकांना ऑनलाईन देवदर्शन, स्वस्तात देवदर्शनाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. मुंबईचा कांदिवली बोरिवली परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वस्तात चारधाम यात्रेचे आमिष दाखवून लाखो रुपये घेवून ट्रॅव्हल्स एजेंट फरार झाल्याचे उघडकीस आले. कांदिवली पोलिसांनी तपास करत या लबाड ट्रॅव्हल्स एजेंटला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या कांदिवली बोरिवली (Mumbai) परिसरात कार्यरत असलेल्या ट्रॅव्हल्स एजंटकडून अल्पदरात चारधाम यात्रा आयोजित करणायाबाबत वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आल्या होत्या. या जाहिरातीला बळी पडत परिसरातील शेकडो नागरिकांनी या ट्रॅव्हल्स एजंटकडे पैसे जमा केले.

मात्र प्रत्यक्षात देवदर्शन यात्रेला जाण्याची तारीख जवळ येताच ट्रॅव्हल्स एजंट कार्यालय बंद करून फरार झाला. यामुळे शेकडो नागरिकांची फसवणूक झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजेश पटेल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो सध्या कांदिवली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने अशाप्रकारे मुंबई आणि परिसरात किती नागरिकांची फसवणूक केली आहे यासंदर्भात कांदिवली पोलीस कसून तपास करत आहेत. तसेच नागरिकांना अशा कोणत्याही आमिषांना बळी न पडण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक, सामाजिक न्याय भवनावर चढले मराठा तरुण

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

High Court: आईपासून वेगळं हो, बायकोच्या हट्टाला नवऱ्याकडून नकार, शेवटी कोर्टानेच दिला मोठा निर्णय

Swara Bhasker: 'मी राणी पद्मावतीला भित्री म्हटलं नाही...'; त्या प्रकरणावरून ट्रोल झालेल्या स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT