Grampanchayat Election 2023 : आदिवासी पट्ट्यात मतदारांचा मोठा प्रतिसाद; मतदान केंद्रांवर लांब रांगा

Nandurbar News : सीमावरती भागातील ग्रामपंचायतींमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत
Grampanchayat Election
Grampanchayat Election Saam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानासाठी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) सीमावरती भागात असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा  लागल्या आहेत. दुपारनंतर मतदार मोठ्या (Nandurbar) प्रमाणात मतदानासाठी बाहेर निघाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे. (Latest Marathi News)

Grampanchayat Election
Pune News: रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडला अन् विहिरीत उडी घेतली; पुण्यातील घटनेनं खळबळ

नंदुरबार जिल्ह्यात १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून सकाळी १० वाजेनंतर मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. विशेष म्हणजे यापैकी बहुसंख्य ग्रामपंचायत या मध्यप्रदेशच्या सीमा वरती भागात आहेत. सीमावरती भागातील ग्रामपंचायतींमध्ये (Grampanchayat) मोठा उत्साह दिसून येत असून मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत. मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे चित्र आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Grampanchayat Election
Grampanchayat Election 2023 : नाशिकमध्ये ग्रामपंचायत निवडणूक उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; कोल्हापूर, अमरावतीतही गोंधळ

यंदा ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या मतदानाची वाढती टक्केवारी प्रस्थापितांना धक्का देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दहा वाजेपासूनच मतदारांच्या रागा लागल्याने निवडणुका खूप चुरशीच्या झाल्या आहेत. मध्यप्रदेशच्या सीमा वरती भागात असलेल्या गोगापूर या गावातील मतदान केंद्रावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com