Manasvi Choudhary
कडधान्ये आहारात महत्वाची मानल जातात. कडधान्ये खाल्ल्याने शरीराला आवश्यक ती पोषणतत्वे मिळतात. मूग, मटकी आणि वटाणा ही कडधान्ये खाल्ल्याने प्रथिने, फायबर ही घटके मिळतात.
मात्र एक महिना सलग ३० दिवस आहारत कडधान्ये खाल्ली नाही तर शरीरात अनेक बदल होतात. ते कोणते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
कडधान्यांमध्ये प्रथिने असतात यामुळे शरीराला फायदा होतो. मात्र जर १ महिना कडधान्ये खाल्ली नाहीत, तर शरीराला प्रथिनांची कमतरता भासेल.
कडधान्यांमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते, जे आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवून पचनक्रिया मजबूत करते. मात्र कडधान्य खाल्ली नाही तर बद्धकोष्ठता, पचनक्रिया बिघडू शकते.
कडधान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. महिनाभर कडधान्ये खाल्ली नाही तर मधुमेहाचा धोका उद्भवू शकतो.
कडधान्यांमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि बी-विटॅमिन्स भरपूर असतात. या पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळे रक्ताची कमतरता होऊ शकते
कडधान्ये खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि बराच वेळ भूक लागत नाही. जर तुम्ही कडधान्ये खाणे बंद केले, वजनावर परिणाम होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.