Mumbai Crime news  Saam Tv
क्राईम

Crime News : आठवीच्या मुलाचे शाळेत भयंकर कृत्य, वॉशरूममध्ये वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime news : मुंबईतील एका नामांकित शाळेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्याविरोधात गंभीर आरोप

  • पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली

  • प्रकरणी POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद

  • घटनेनंतर शाळा आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील मित्रावर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी संबंधित विद्यार्थ्याची स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने शाळेतील मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका नामंकित शाळेतील ८वीत शिकणारा विद्यार्थी आपल्या वर्गमित्राशी अश्लील वर्तन करायचा. त्यानंतर पुन्हा त्याने वर्गमित्रावर त्याच्या घरा जवळील एका निर्जन ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना पीडित मुलाने आपल्या आईला सांगितली. पीडित मुलाच्या आईने तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केला. आणि तपासकार्यात भयानक गोष्ट समोर आली. फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपी मुलाने पीडित मुलाला मारहाण केल्याचं समजलं. शिवाय बाथरूममध्ये नेऊन त्याच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. मात्र पीडित मुलाने घाबरून आपल्या कुटुंबियांना याबद्दल काही सांगितलं नाही.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली पुढील तपास सुरू केला आहे. तसेच शाळा अधिकारी आणि पालकांशी चौकशी करत आहेत. या धक्कादायक घटनेनंतर संबंधित शाळेतील मुले आणि पालकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT