mumbai Crime News Saam tv
क्राईम

Mumbai Crime: डोक्यात टपली मारल्याचा राग... मित्रासोबत केलं भयंकर कृत्य; जुहू परिसरातील खळबळजनक घटना

Crime News Update: याप्रकरणी जुहू पोलिसांनी हल्लेखोर तरुणास अटक केली आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी

Mumbai Crime News:

डोक्यात टपली मारल्याच्या रागातून बियरच्या बाटलीने तरुणावर वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू परिसरातून समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू परिसरात क्षुल्लक कारणावरुन तरुणाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. डोक्यात टपली मारल्याच्या रागातून तरुणाने बियरच्या धारदार बाटलीने आपल्याच मित्राच्या डोक्यावर, गळ्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर जखमा केल्या.

नागेश बाबा दुधकवरे (35 वर्षे) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला महापालिकेच्या कूपर रुग्णालयात (Koopar Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी जुहू पोलिसांनी हल्लेखोर तरुणास अटक केली आहे. प्रजापती उर्फ टर्की असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो सध्या जुहू पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस अधिकचा तपास करत आहेत. (Latest Marathi News)

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मामीचा कारनामा, १० वर्षे लहान भाच्यासोबत फुर्रर्रर्र...! मंदिरात जाते असं सांगून घरातून निघाली ती परतलीच नाही

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणावर शरद पवार यांचं मोठं विधान

Maharashtra News Live Update: रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात नागरिकांचा मोर्चा

Bhooth Bangla Trailer Review: नव्या चित्रपटाचा जुना ट्रेलर; अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये 'भागमभाग', 'भूल भुलैया'ची खिचडी

Goa Tourism : गोव्यातील 'हा' समुद्रकिनारा रात्री हिऱ्यासारखा चमकतो, पाहताच क्षणी सौंदर्यात हरवून जाल

SCROLL FOR NEXT