Women Fight Video: धावत्या बसमध्ये WWE चा थरार, महिलांनी एकमेकींना कानफटवलं; प्रवासी बघतचं राहिले

Women Fight Viral Video: बसमध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरुन दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
two women clash in running bus wwe fight viral video
two women clash in running bus wwe fight viral video Saam TV
Published On

Women Fight Viral Video

लोकल ट्रेन असो, की एसटी बस जागेसाठी प्रवाशांमध्ये नेहमी भांडणं होत असतात. कधी भांडणं सल्लामसलतीने सोडवली जातात. तर काही वेळा ती विकोपाला देखील जातात. यावरुन पुढे हाणामारीच्या घटना घडतात. अशीच एक घटना राजधानी दिल्लीतून समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

two women clash in running bus wwe fight viral video
Cat And Parrot Fight: झोपेतून डिस्टर्ब केलं...! मांजरीने पोपटाला धू धू धुतलं; क्युट आणि फनी VIDEO एकदा पाहाच

यामध्ये बसमध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरुन दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) काही प्रवासी बसमधून प्रवास करताना दिसून येत आहे. बसमध्ये गर्दी असल्यामुळे काही प्रवासी उभे राहून प्रवास करताना दिसून येत आहे. अचानक सीटवर बसण्याच्या रागातून दोन महिलांमध्ये बाचाबाची सुरू होते.

वाद इतका विकोपाला जातो की दोन्ही महिलांमध्ये हाणामारी सुरू होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी चक्रावून जातात काहीजण या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तरी देखील या महिला एकमेकांचे केस ओढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहे.

याशिवाय दोन्ही महिलांकडून एकमेकांना शिवीगाळ देखील केली जात आहे. हा व्हिडीओ 'DELHIBUSES1' या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी बघितला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com