Mother gives permission to boyfriend for physically abusing two minor daughters in thiruvananthapuram  Saam TV
क्राईम

Crime News: विकृती! आईनंच पोटच्या मुलींना प्रियकराच्या हवाली केलं, वर्षभर अगणित अत्याचार; कोर्टाने सुनावली ४० वर्षांची शिक्षा

Satish Daud

Kerala Mother Boyfriend Criminal Case

जन्मदात्या आईनेच आपल्या ७ वर्षाच्या मुलींवर प्रियकराला वारंवार अत्याचार करायला लावला. इतकंच नाही, तर अत्याचार करताना आसूरी आनंद घेत त्याला प्रेरित देखील केलं. तळपायाची आग मस्तकात जाईल, अशी ही संतापजनक घटना केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी कोर्टाने क्रूर आईला ४० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. केरळ येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने सोमवारी हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात फक्त पीडित मुलीच्या आईलाच शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कारण, अत्याचार करणाऱ्या आरोपीने यापूर्वीच आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली होती. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये राहणाऱ्या आरोपी महिलेचा पती मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हता. त्यामुळे महिला आपल्या दोन मुलींसह भाड्याच्या घरात राहत होती.

यादरम्यान, महिलेचे शिशुपालन नावाच्या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही अनेकवेळा शय्या केली. दरम्यान, वासनाधिन शिशुपालनची नजर महिलेच्या मुलीवर देखील पडली. त्याने महिलेची संमती घेत ७ वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Crime News) केले.

संतापजनक बाब म्हणजे या कृत्यासाठी महिला स्वत: शिशुपालन याला प्रेरित करीत होती. हा संपूर्ण प्रकार २०१८ ते २०१९ या कालावधीत घडला. वेदना असह्य झाल्याने पीडित मुलीने सर्व प्रकार आपल्या ११ वर्षीय बहिणीला सांगितला.

तेव्हा नराधम आरोपीने पीडितेच्या बहिणीवर देखील वारंवार बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा झाली. आरोपी आणि आईचे कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने मुली धास्तावल्या.

त्यांनी घरातून पळ काढत थेट आजीचं घर गाठलं. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नराधम आई आणि तिच्या प्रियकरावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पुढे महिलेच्या प्रियकराने आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली. आता या प्रकरणात कोर्टाने पीडित मुलींच्या क्रूर आईला ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी २२ साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT