Haryana Crime Saam Tv
क्राईम

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

Haryana Crime: हरियाणामध्ये हॉकी खेळाडूवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. ज्युनिअर कोचने स्टेडिअमच्या बाथरूममध्ये नेऊन हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary -

  • हरियाणामध्ये क्रीडा क्षेत्रात भयंकर घटना घडली

  • अल्पवयीन हॉकी खेळाडूवर कोचने बलात्कार केला

  • ज्युनिअर कोचविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली

  • पीडित मुलगी गरोदर राहिल्यावर प्रकरण समोर आले

हरियाणामध्ये हॉकी खेळाडूवर कोचने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यात ही घटना घडली. अल्पवयीन हॉकी खेळाडूवर कोचने स्टेडिअमच्या बाथरूममध्ये बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्युनिअर कोचविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने ९ जानेवारीला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित मुलगी १२ वीमध्ये शिकते. ती हॉकी खेळते. ३ वर्षांपासून तिची ज्युनिअर हॉकी कोचसोबत ओळख आहे. ४ महिन्यांपूर्वी हॉकी कोचने स्टेडिअमच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिली. ५ जानेवारीला तिचा गर्भपात करण्यात आला. प्रकृती खराब झाल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना तिला रुग्णालयात दाखल केले त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी ज्युनिअर कोचला अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने आरोपीला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे हरियाणामध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा शिंदेसेनेच्या आमदाराविरोधात संताप

Sunday Horoscope: नशीब चमकणार! या 3 राशींना मिळणार मोठी संधी; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : दुसरी स्त्री आवडूनही पुरुष तिच्याशी नात्याची कमिटमेंट का करत नाहीत? ‘ही’ 5 कारणं

Sunday Horoscope: मेष, सिंह, धनुसह या राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT