shocking news x
क्राईम

Shocking : आधी मैत्री केली, नंतर वारंवार सामूहिक अत्याचार, व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...; 'त्या' सहा जणांनी क्रूरतेचा कळसच गाठला

Crime News : कर्नाटकच्या बेळगावमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका अल्पवयीन मुलीवर सहाजणांनी वारंवार सामूहिक अत्याचार केला. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Yash Shirke

कर्नाटकमधील बेळगाव शहरात एका अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी प्रौढ आहेत, तर पीडिता अल्पवयीन आहे. या घटनेत ६ गुन्हेगार आहेत, त्यापैकी ५ जणांना अटक केली आहे, एकजण फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहा आरोपींनी मुलीला एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी संपूर्ण घटना त्यांच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली. कोणाला काही सांगितलंस तर याद राख अशी धमकी आरोपींनी पीडितेला दिली. त्यानंतर जानेवारी महिन्यात आरोपींच्या गटातील तिघांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. या घृणास्पद गुन्ह्याची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत सहा आरोपींपैकी पाचजणांना अटक केली. सध्या सहावा आरोपी फरार आहे, त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

बेळगावचे पोलीस आयुक्त बोरसे भूषण यांनी या प्रकरणाची माहिती दिली. 'सर्व आरोपी प्रौढ आहेत. त्यांच्या विरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात आरोपींपैकी एकाने मुलीशी मैत्री केली आणि तिला निर्जन ठिकाणी नेले. फोन करुन मित्रांना बोलावले. आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि सर्व घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली. व्हिडीओ लीक करु अशी धमकी देत सहापैकी तिघांनी मुलीवर पुन्हा बलात्कार केला. फॉरेन्सिक टीम सर्व नमुने आणि पुरावे गोळा करत आहे. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल', अशी माहिती बेळगावच्या आयुक्तांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT