Meerut Murder Case CCTV Footage X (Twitter)
क्राईम

Meerut Murder Case : हत्येपूर्वी बाईकवर दिसला होता सौरभ, मुस्कानसाठी घेतलं पार्सल; शेवटच्या क्षणी काय घडलं? CCTV फुटेज समोर

Meerut Murder Case Update : उत्तरप्रदेशच्या मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडातील नवी अपडेट समोर आली आहे. हत्येपूर्वी सौरभ बाईकवरुन घरी जात असल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडाची देशभरात चर्चा होत आहे. दररोज या प्रकरणातील नवनवीन खुलासे होत आहेत. याच दरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, या फुटेजमध्ये सौरभ राजपूत शेवटचा जिवंत दिसत आहे. हे फुटेज ३ मार्च रात्री ११.४९ वाजताचे असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये सौरभ त्याच्या मित्रासोबत बाईकवरुन घरी परत असल्याचे दिसते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये सौरभ राजपूत बाईकवर बसून घरी जेवण घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच जेवणामध्ये त्याच्या बायकोने, मुस्कानने गुंगीचे औषध मिसळले होते. या जेवणामुळे सौरभ बेशुद्ध पडला. त्यानंतर मुस्कानने बॉयफ्रेंड साहिल शुक्लासोबत मिळून सौरभची निर्घृण हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे १५ तुकडे करुन एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले.

दरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सौरभसोबत असलेल्या बाईकवरील दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसल्याचे म्हटले जात आहे. पोलीस सौरभच्या घराजवळील परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या हत्याकांडामध्ये सामील असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

सौरभ राजपूत हत्याकांडातील आरोपी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला मेरठच्या चौधरी चरणसिंह जिल्हा कारागृहात बंद आहेत. दोघांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. कारागृह प्रशासनाकडे ते अंमली पदार्थांची मागणी करत आहेत. अंमली पदार्थ मिळत नसल्याने त्यांनी अन्नपाणी सोडल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT