Maval Crime Saam tv
क्राईम

Maval Crime: मावळमधील सक्रिय पाच गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई; मागील तीन महिन्यात झाले ४ खून

Maval News : २०२३ या चालू वर्षांमध्ये एकूण २८३ गुन्हेगारांवरती मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली

दिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुका हा २०२३ मध्ये सर्वाधिक खून होणारा तालुका म्हणून ओळखला गेला. मावळ तालुक्यामध्ये मुळशी पॅटर्न सुरू झाल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती. परंतु मावळ तालुक्यातील गुन्हेगारीला काहीसा आळा बसल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. या सक्रिय असलेल्या गॅंगवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केल्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारी वातावरण काहीसं शांत पाहायला मिळत आहे. (Maharashtra News)

मावळ तालुक्यात तीन महिन्यांमध्ये चार खुनाच्या घटना घडल्या. यामध्ये शिरगाव सरपंच यांचा भर चौकात कोयत्याने वार करत खून करण्यात आला. वेगवेगळ्या कारणातून अनेक खून मावळ तालुक्यामध्ये झाले. यात सगळ्यात मोठा राजकीय खून म्हणजे किशोर आवारे यांचा करण्यात आला. त्यांची निर्घृणपणे भर दिवसा तळेगाव नगरपरिषदेच्या समोर हत्या करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण मावळ तालुक्यासह महाराष्ट्र देखील हादरला. त्यामुळेच मावळ तालुका मुळशी पॅटर्न होतोय; अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली. मात्र किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर पोलीस देखील ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळालं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षभरात २८३ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अँटी गुंडा स्कॉडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांची टीम ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळालं. २०२३ या चालू वर्षांमध्ये एकूण २८३ गुन्हेगारांवरती मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. किशोर आवारे मर्डरनंतर मावळमधील गुन्हेगारी मोडून काढण्यात पोलिसांना काहीसं यश आलं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी तातडीने तळेगाव दाभाडे येथे अँटी गुंडा स्कॉडची स्थापना केली. त्यामुळे गुन्हेगारीचे हब तयार होऊ लागलेल्या मावळमधील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी याची मदत झाली. मावळ तालुक्यामध्ये सक्रिय असणाऱ्या पाच गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रमोद सांडभोर गॅंग, अमोल गोपाळे गॅंग, कीटक गॅंग, कुणाल ठाकूर गॅंग, सुधीर परदेशी गॅंग अशा पाच गॅंग वरती मोक्का लावण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT