Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: क्रूरतेचा कळस! JCB ला उलटं लटकवलं, बेल्ट-काठीने ३ तास अमानुष मारहाण; जखमेवर मीठ चोळलं

Rajasthan Police: राजस्थानमध्ये जेसीबीला उटलं लटकवून तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

राजस्थानच्या ब्यावरमधील रायपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. जेसीबीला उलटं लटकवून तरुणाला बेदम मारहाण केली. अक्षरश: या तरुणाला बेल्ट आणि काठीने मारहाण करत त्याचं अंग सोलून काठलं. जवळपास ३ तास तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी हिस्ट्रीशीटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिस्ट्रीशीटर तेजपाल सिंग उदावत हा एका कारखान्याचा मालक आहे. त्याने सिमेंट आणि डिझेल चोरीच्या संशयावरून त्याच्या ड्रायव्हरला जेसीबीला उलटे लटकवून अमानुष मारहाण केली. या ड्रयव्हरला तब्बल ३ तास मारहाण करण्यात आली. त्याच्या जखमांवर मीठ चोळण्यात आलं. ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे. याचा व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई केली.

तेजपाल सिंग उदावत हा रायपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुडिया गावचा रहिवासी आहे. गावाजवळ त्याचे एक फार्म हाऊस आहे जिथे जेसीबी, डंपर आणि इतर वाहने पार्क केली जातात. तेजपाल बेकायदेशीर उत्खनन आणि रेतीची वाहतूक करण्याचे काम करतो. त्याच्याविरुद्ध रायपूर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो गुन्हेगार देखील आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याने स्वतःच्या जेसीबी ड्रायव्हर याकुबला डिझेल चोरीच्या संशयावरून पकडले आणि त्याला जेसीबीला उलटं लटकवत मारहाण केली. यावेळी फार्म हाऊसवर बरेच जण उपस्थित होते पण कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.

पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुण याकूब सारधना गावचा रहिवासी आहे. तो आरोपी तेजपालच्या डंपरवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तेजपालला याकूबवर डिझेल आणि सिमेंट चोरीचा संशय होता. याच कारणास्तव ७ एप्रिल रोजी तेजपाल आणि त्याच्या साथीदारांनी याकूबला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि गुडिया गावात असलेल्या सिमेंट कारखान्यात नेले. जिथे त्याला जेसीबीला लटकवून बेदम मारहाण करण्यात आली. आणि मारहाण केल्यानंतर कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी देऊन त्याला सोडून देण्यात आले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीओ जैतरण आणि रायपूर पोलिस स्टेशनच्या मदतीने तेजपाल आणि परमेश्वर यांना गुडिया येथील कारखान्यातून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT