Solapur Crime: आईसोबत शारीरिक संबंध, मुलीनं नको त्या अवस्थेत पाहिलं; बापाने पोटच्या लेकीची हत्या करून घरासमोरच पुरलं

Solapur Police: सोलापूरमध्ये बापाने आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतल्याची घटना घडली. आईसोबत असलेले शारीरिक संबध लपवण्यासाठी त्याने हे क्रूर कृत्य केले. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
Solapur Crime: पप्पा आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या बापाने चिमुकलीचा जीव घेतला
Solapur CrimeSaam Tv
Published On

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये बापाने आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नराधम बापाने हत्येनंतर मुलीचा मृतदेह घरासमोरच जमिनीमध्ये पुरला. आईसोबत असलेल्या संबंधाची वाच्यता कुठे करू नये याच कारणावरून बापाने मुलीची हत्या केली. संताप आणि चीड आणणारी ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात घडली. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून बापाने पोटच्या चिमुकल्या मुलीला संपवलं. दक्षिण सोलापूरमध्ये कुसूर गावात ही घटना घडली. ओगसिद्ध कोठे असं आरोपी बापाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याविरोधात कारवाई केली.

Solapur Crime: पप्पा आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या बापाने चिमुकलीचा जीव घेतला
Crime News : घरी कुणी नसताना आत शिरला, २२ वर्षीय तरुणीचा गळा चिरला; साखरपुडा मोडणं पडलं महागात

शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण सोलापुरातील कुसूर गावात एका ८ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. पण शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली. गळा दाबून मुलीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.

Solapur Crime: पप्पा आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या बापाने चिमुकलीचा जीव घेतला
Crime : लग्नाच्या मंडपात खेळत होती ३ वर्षांची चिमुरडी, मिठाईचं आमिष दाखवत पळवलं, अत्याचार केल्यानंतर संपवलं

हत्या करण्यात आलेल्या श्रावणीने पप्पा आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिले होते. हा प्रकार तिने कोणाला सांगू नये यासाठी आरोपीने मृत श्रावणीला बेदम मारहाण देखील केली होती. शुक्रवारी नराधमाने पत्नी घरी नसल्याची संधी साधत पोटची मुलगी श्रावणीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह घराच्यासमोरच खड्यात पुरून ठेवला. मात्र गावातील पोलिस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले.

Solapur Crime: पप्पा आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या बापाने चिमुकलीचा जीव घेतला
Nashik Crime : वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती; सासरच्या त्रासाला कंटाळून भक्तीनं जीव दिला, अंगावरील खुणांमुळे संशय वाढला

पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी हा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर या मुलीची हत्या झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मृत मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपी नराधम बाप ओगसिद्ध कोठे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर मंद्रूप पोलिसांनी आरोपी ओगसिद्ध कोटेविरोधात 103(1), 238 नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक केली.

Solapur Crime: पप्पा आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या बापाने चिमुकलीचा जीव घेतला
Pune Crime : आधी मारहाण, मग दगडाने ठेचून मारलं, पतीचा पत्नीसोबत रक्तरंजीत खेळ; धक्कादायक कारण समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com