Andhra Pradesh crime Saam Tv
क्राईम

Shocking crime news: कुऱ्हाडीने पत्नीवर हल्ला, कापलेला पाय घेऊन पती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, नेमकं घडलं काय?

Andhra Pradesh crime: आंध्र प्रदेशातील मुप्पल्ला मंडलममध्ये पतीने संशयातून पत्नीवर कुल्हाडीने हल्ला करून तिचा पाय कापल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने कापलेला पाय घेऊन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले असून पीडितेवर उपचार सुरू आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आलीये. ही घटना समोर येताच कौटुंबिक वाद किती भयानक वळण घेऊ शकतो याचं हे भयावह उदाहरण समोर आलंय. आंध्र प्रदेशातील मुप्पल्ला मंडलमधील थोंडपी गावात ही घटना घडली असून, एका व्यक्तीने संतापाच्या भरात आपल्या पत्नीवर थेट कुऱ्हाडीने वार करत तिचा पाय शरीरापासून वेगळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.

महत्त्वाचं म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतर आरोपी स्वतः कापलेला पाय घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन सरेंडर झाला. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपी वेल्लेपु लक्ष्मैया हा रोजंदारी करणारा मजूर असून. त्याला आपल्या पत्नीवर अफेअर असल्याचा संशय होता. याच संशयातून घरात नेहमीच वाद होत होता. पत्नी भूलक्ष्मी हिच्यासोबत त्याचं यापूर्वीही अनेक वेळा भांडण झालं होतं.

गुरुवारी मात्र हा वाद टोकाला गेला. दोघांमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर लक्ष्मैयाला राग आवरता आला नाही. यावेळी त्याने संतापाच्या भरात पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. त्याने वारंवार कुऱ्हाडीने वार केले, ज्यामुळे तिचा पाय कापला गेला.

कापलेला पाय घेऊन पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये.

घटनेनंतर आरोपी कापलेला पाय हातात घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि शरण आला. सब-इन्स्पेक्टर के. अनिल कुमार यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच कापलेला पाय गुंटूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. हा पाय पुन्हा महिलेला जोडता येईल का याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकाला सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या भूलक्ष्मीला शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला मंगळगिरीमधील एनआरआय मेडिकल कॉलेजमध्ये हलवलं. डॉक्टर तिच्यावर उपचार करत असून तिचा पाय वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उपवासाला नाश्त्याला बनवा कुरकुरीत रताळे, फक्त १० मिनिटांत तयार होईल झटपट रेसिपी

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील आरोपीला जामीन

भाजपमध्ये मोठा फेरबदल; अमित मालवीय यांना IT सेलच्या प्रमुख पदावरून हटवल; केमिस्ट्री प्रोफेसरकडे नेतृत्व

Chandra Grahan Horoscope: चंद्रग्रहणानंतर नशीब बदलणार! ‘या’ 3 राशींवर धनवर्षाव अन् करिअरमध्ये प्रगती होणार; जाणून घ्या कोणत्या?

45 दिवस रोज एक केळ खाल्लं तर शरीरात काय होतं? जाणून घ्या परिणाम

SCROLL FOR NEXT