Wedding catering crisis saam tv
क्राईम

Crime News: लग्नानंतर पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेताच बसला धक्का; नवरा थेट पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये

Police investigation in mainpuri marriage dispute: मैनपुरीमध्ये लग्नानंतर तरुणाने फसवणुकीचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महत्त्वाची माहिती लपवून लग्न लावल्याचा दावा करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर उघड झालेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडालीये. आनंदाच्या भरात पार पडलेलं हे लग्न काही दिवसांतच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. यावेळी तरूणाने आपलं लग्न तृतीयपंथीशी लग्न झाल्याचा आरोप केला आहे.

या घटनेमध्ये एक तरूणाला लग्नाच्या रात्री जे समजलं ते फारच धक्कादायक होतं. ज्या महिलेसोबत त्याने सप्तपदी घेतली होती ती महिला नसून तृतीयपंथी होती. ही घटना कळताच कुटुंबियांच्या आनंदावर विरजण पडलं. या घटनेनंतर तरूणाने पोलीस स्टेशन गाठलं असून फसवणूकीची तक्रार केली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, किशनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या तरुणाचं २५ मार्च रोजी बिछवा भागातील एका गावातील तरुणीसोबत थाटामाटात लग्न झालं. लग्नसोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. दुसऱ्या दिवशी वधूला सासरी आणल्यानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं.

मात्र, या आनंदावर काही वेळातच विरजण पडलं. लग्नानंतर दोन दिवसांनी म्हणजे २८ मार्च रोजी नवऱ्याला एक धक्कादायक गोष्ट समजली. त्याने केलेल्या आरोपानुसार, ज्याला तो पत्नी म्हणून घरी घेऊन आला ती तृतीयपंथी असल्याचं त्याला कळलं. ही बाब समजताच त्याच्यासह संपूर्ण कुटुंब हादरलं.

कुटुंबियांना सांगितला संपूर्ण प्रकार

या घटनेनंतर तरुणाने आपल्या कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. कुटुंबाने एकत्रित चर्चा करून पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. या तरुणाने किशनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केलेत. त्याचा आरोप आहे की, लग्नाआधी किंवा लग्नाच्या वेळी ही महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवण्यात आली आणि त्याची फसवणूक करून हे लग्न लावण्यात आलं.

तरुणाच्या तक्रारीनुसार, ही गोष्ट उघड झाल्यानंतर नववधू तिच्या माहेरी परतली आहे. लग्नात मिळालेले दागिने आणि रोख रक्कमही ती सोबत घेऊन गेली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणाने पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी केलीये. किशनी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वरुणराज भिडे पुरस्काराचे वितरण

गुरू-शिष्याच्या नात्याचा काळिमा फासणारी घटना; ८ वीत शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकाचं भयंकर कृत्य

MLC Election: अंबादास दानवेंच्या उमेदवारीवरुन मविआत फूट? काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार; ७ जणांची नावं चर्चेत

Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

अखेर प्रतीक्षा संपली! डोंबिवलीतील रेतिबंदर पूल आता लवकरच उभा राहणार

SCROLL FOR NEXT